अमेरिकेत थरारक-साहित्यिक वळणाची पत्रकारी सुरु करणारा टेरी मॅक्डोनेल
टेरी मॅकडोनेल. टेरी मॅकडोनेल. प्रसिद्ध न्यूजवीक आणि टाईम या साप्ताहिकाचं संपादन त्यांनी केलं. १९६९ मधे त्यांनी बातमीदारी आणि छायाचित्रणाला सुरवात केली. १९७४ मधे ते सॅन फ्रान्सिस्को मॅगझीनचे सहायक संपादक झाले. तिथून सुरू झालेली त्यांची संपादन कारकीर्द २०१२ साली टाईम साप्ताहिकाच्या सल्लागार संपादकीय कामगिरीपर्यंत गाजत राहिली. त्यानंतर ते मुक्त पत्रकार झाले. भटक्या टेरीचा बहुतेक वेळ प्रवासात जात असे. टॉम हँक्सचा फॉरेस्ट गंप आठवतोय? मुक्त जीवन जगणारा, अमेरिकाभर पळणारा, धाडसी, गंप. टेरीना पत्रकारीतला फॉरेस्ट गंप म्हणत. अमेरिकन पत्रकारीत खेळ, मनोरंजन, धाडस,…