एकविसाव्या शतकातला (एक) हिटलर
ही गेल्या दोनेक महिन्यातली एक घटना. मनिला शहरातला एक विभाग. चिंचोळ्या गल्ल्या. गल्लीच्या दोन्ही कडांना पत्र्याची घरं आणि घरांना कार्डबोर्डचे दरवाजे. तळ मजला आणि त्यावर एक लडखडत उभा असलेला दुसरा मजला. मध्य रात्र उलटून गेल्यानंतर एक वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी एक मोटारसाकल एका घरासमोर उभी रहाते. बाईकस्वार उतरून पहिल्या मजल्यावर जातो. गोळ्या झाडल्याचे आवाज होतात. एक लहान मुलगा मारला जातो. नंतर त्याचा बाप मारला जातो. नंतर त्या मुलाची आई मारली जाते. बाईकस्वार जिना उतरून बाईकवरून निघून जातो. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात त्याच्या जाण्यायेण्याच्या…