भ्रष्टाचार आहे की नाही ते माहित नाही पण गैरव्यवहार आणि घातक व्यवहार मात्र नक्कीच आहे.
राफेल विमानांच्या किमती वाढल्या.करारानुसार वाढीव रक्कम दसॉ आणि रिलायन्स या कंपन्यांना वाटून मिळाली. ।। १३ मार्च २०१४ रोजी राफेल विमानांच्या बाबतीत दसॉ ही फ्रेंच कंपनी आणि हिंदुस्थान एरोनॉटिक्स (हिंए) ही भारत सरकारची कंपनी यांच्यात करार झाला. त्यानुसार भारतासाठी दसॉ १०८ लढाऊ विमानं तयार करणार होती. प्रत्येक विमानाची अदमासे किमत ६७० कोटी रुपये होती. ७० टक्के निर्मिती हिंए आणि ३० टक्के निर्मिती दसॉ करणार होती. २७ मे २०१४ रोजी एनडीएचं सरकार स्थापन झालं. नरेंद्र मोदी पंतप्रधान आणि अरूण जेटली संरक्षण…