सरकारला दूर ठेवून समाजहित

सरकारला दूर ठेवून समाजहित

टॅक्स जस्टिस नेटवर्क नावाची एक संस्था आहे. ऑस्ट्रिया, जर्मनी, ब्रीटन, फ्रान्स इत्यादी अनेक युरोपियन देशात ही संस्था काम करते. देशातल्या करव्यवस्था;  कर चुकण्याच्या तरतुदी; किती माणसं  किती कर कसा चुकवतात; कर व्यवस्थेत करचोरी थांबवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या तरतुदी; समाजाचं कर उत्पन्न वाढण्याला पोषक कर व्यवस्था; या विषयांचा अभ्यास ही संस्था करते. वेळोवेळी केलेले अभ्यास ही संस्था जनतेसमोर ठेवते, सरकारकडं पोचती करते, विधीमंडळ सदस्यांना पुरवते. खाज असणारी माणसं या संस्थेत काम करतात. प्रत्येकाची बुडाची खाज हेच या संस्थेजवळचं भांडवल. सरकार आणि धनाढ्य…

Read More Read More

सद्दाम

सद्दाम

सद्दाम हुसैन, इराक आणि अमेरिका. ❖ पुस्तक    The Achilles Trap: Saddam Hussein, the United States and the Middle East  लेखक     Steve Coll. प्रकाशक  Allen Lane ❖ सद्दाम हुसैन म्हटल्यावर त्याची शारीरिक छबी डोळ्यासमोर येईलच असं नाही, पण त्यांचं शब्दचित्र पटकन डोळ्यासमोर येतं. एक हुकूमशहा. एक क्रूरकर्मा. वयाच्या विसाव्या वर्षी सद्दाम हुसैनचा बाथ या राजकीय पक्षात प्रवेश झाला तोच मुळी एक असॅसिन, खुनी, म्हणून. पुढं इराकचा प्रेसिडेंट होण्यापर्यंतच्या वाटचालीत त्यानं किती माणसं मारली असतील ते मोजणंही कठीण. असा हा…

Read More Read More

डळमळीत लोकशाही- तांझानिया

डळमळीत लोकशाही- तांझानिया

तांझानियातली डळमळीत लोकशाही तांझानियाच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. उद्याच्या डिसेंबरमधे स्थानिक संस्थांच्या निवडणुका होतील आणि पुढल्या वर्षी ऑक्टोबरमधे लोकसभेच्या निवडणुका होतील. तांझानियाच्या दारे सलाम या राजधानीच्या गावातली नुकतीच घडलेला घटना. तांझानियाच्या चाडेमा या विरोधी पक्षाचे सेक्रेटरी अली महंमद किबाव घरी परतत असताना बसमधून त्यांना काही लोकांनी उतरवलं. त्यांचे हात बांधले. घेऊन गेले. दुसऱ्या दिवशी त्याचं प्रेत सापडलं. त्याच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा होत्या, त्याच्या चेहऱ्यावर ॲसिडच्या खुणा होत्या. गेले काही दिवस विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या अपहरणाच्या घटना घडत आहेत. तांझानियाला हडेलहप्पी आणि…

Read More Read More

ट्रंप आणि हिंसाचार

ट्रंप आणि हिंसाचार

ट्रंप आणि हिंसाचार ट्रंप म्हणजे हिंसेला आमंत्रण १० सप्टेंबर २०२४ रोजी ट्रंप-हॅरिस यांच्यात टीव्हीचर्चा झाली. ट्रंप यांच्या वक्तव्यात चिथावणी होती, हिंसाचाराची मुळं होती.    🔪 १५ सप्टेंबर २०२४. डोनल्ड ट्रंप त्यांच्या फ्लोरिडातल्या गोल्फ क्लबवर  गोल्फ खेळत होते.   गोल्फ कोर्सच्या परिघावर असलेल्या झाडांच्या रांगेत रायन राऊथ नावाचा ५८ वर्षाचा एक माणूस लपला होता. त्याच्या हातात एसकेएस पद्धतीची सेमी ऑटोमॅटिक बंदूक होती, बंदुकीवर टेलेस्कोप होता, गोप्रो हा कॅमेरा होता. त्यातून तो ट्रंपवर लक्ष ठेवून होता. ट्रंप ३०० ते ५०० मीटर येवढ्या…

Read More Read More

अरबी शैली पुढं नेणारा कादंबरीकार

अरबी शैली पुढं नेणारा कादंबरीकार

लेबनीज कादंबरीकाराचं निधन  ❖ २०२४ च्या सप्टेंबरात इलियास खूरी यांचं निधन झालं. ते लेबॅनीज होते, लेबनॉनमधे त्यांचं वास्तव्य होतं. त्यांचे आईवडील ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन होते. त्यांचं सुरवातीचं शिक्षण जॉर्डनमधे झालं आणि नंतरचं शिक्षण पॅरिसमधे झालं. खूरी अरेबिक आणि हिब्रू या दोन्ही भाषांचे उत्तम जाणकार होते. ❖ आधुनिक अरेबिक साहित्यामधे इलियास खूरी यांचं नाव कदाचित नगीब महफूझ यांच्या नंतरचं असेल. महफूझ (नोबेल विजेते) प्रामुख्यानं ऐतिहासिक कादंबरीकार म्हणून ओळखले जात. खूरी स्वतःच म्हणत की मी इतिहास लिहित नाही, मी माणसांचं जगणं लिहितो.   My…

Read More Read More

लेबनॉनमधल्या बिनतारी हिंसा

लेबनॉनमधल्या बिनतारी हिंसा

जगणं नव्हे मरणं आपल्या हाती लेबनॉनमधे लागोपाठ दोन दिवस बिनतारी साधनांचे  स्फोट झाले. त्यात ३२ माणसं मेली, ३१५० माणसं जखमी झाली. साधनं हाताळतांना कोणाचे हात जळले, कोणाचे चेहरे जळले. पहिल्या दिवशी स्फोटात मरण पावलेल्यांच्या मयतासाठी दुसऱ्या दिवशी गोळा झालेल्या लोकांच्या हातातल्या साधनांचा स्फोट झाला.  जगभर या बातमीमुळं माणसं हादरली आहेत. माणसं मारण्याचं हे नवं तंत्र आपल्याला कुठं नेणारे अशी चिंता लोकांना लागलीय. पेजर, सेलफोन, रेडियो, टीव्ही, वॉकीटॉकी इत्यादी सर्रास वापरली जाणारी साधनं अशा रीतीनं जर वापरली जाणार असतील तर लोकांचं…

Read More Read More

पुस्तक टीव्हीचर्चा एक करमणूक

पुस्तक टीव्हीचर्चा एक करमणूक

जो बायडन टीव्हीवरच्या अध्यक्षीय चर्चेत अडखळले. केवळ तेवढ्यावरून, जो बायडन यांच्या अध्यक्षीय क्षमतेवरून वा कारकीर्दीवरून नव्हे, बायडन अध्यक्षीय निवडणुकीतून बाद झाले. त्यानंतर डोनल्ड ट्रंप आणि कमला हॅरीस यांच्यात टीव्हीचर्चा झाली. काहींच्या मते कमला हॅरिस कॉन्फिडंट होत्या आणि ट्रंप आपण हरलेलो आहोत याच भावनेनं चर्चेत वावरले. आता त्याचा परिमाण मतदानावर काय होतो ते पहायचं. टीव्हीचर्चा सुरु झाल्या तेव्हांपासून एक गोष्ट लक्षात आलीय. मतं पक्की न झालेले अमेरिकन मतदार चर्चेत उमेदवार कसे दिसले, वावरले यावरून आपला निर्णय पक्का करतात. टीव्हीचर्चा घडवून आणणारे…

Read More Read More

परमेश्वराचे दलाल

परमेश्वराचे दलाल

केनयाच्या किनाऱ्यावरच मलिंडी हे गाव. या गावापासून काही अंतरावर एक नॅशनल पार्क आहे. या अभयारण्यात वाघ, सिंग,चित्ते,तरस, लांडगे इत्यादी प्राणी रहातात. या अभयारण्याला लागूनच एक शाकाहोला नावाची गाववस्ती आहे.जंगलात झाडं तोडून ही वस्ती तयार करण्यात आलीय. २०२४ च्या जून जुलैमधे केनयाचे पोलिस शाकाहोलात गेले. शाकाहोलात एक चर्च आहे. त्या चर्चपासून काही अंतरावर पोलिसांनी खोदकाम केलं. फार खोलवर जावं लागलं नाही. पोलिसांना प्रेतं मिळाली. काही ताजी होती,काही काही मातीमय झाली होती.  प्रेतांची संख्या ४००. पॉल मॅकेंझी नावाच्या एका पेंटेकोस्टल बिशपनं ही…

Read More Read More

पुस्तक भारताचा सुवर्ण काळ

पुस्तक भारताचा सुवर्ण काळ

भारताचा सुर्वण काळ.  दी गोल्डन रोड या प्रस्तुत पुस्तकात भारताच्या सुवर्ण काळाचं विश्लेषण आहे. इतिहासात सिल्क रोड ही कल्पना रूढ आहे. चीन (आशिया)  आणि युरोप यामधील दळणवळण प्रामुख्यानं ज्या मध्य आशियाई भागातून होत असे त्याला सिल्क रोड असं म्हणतात. हा मार्ग इसवीपूर्व दुसऱ्या शतकापासून जवळपास १५ व्या शतकापर्यंत वापरला जात होता असं मानलं जातं. अनेक पुस्तकं या कल्पनेबद्दल लिहितात.  इतिहास संशोधक विल्यम डॅलरिंपल म्हणतात की सिल्क रोड ही एक दंतकथा आहे. सिल्क रोड समजा निर्माण झाला असेल तर १२ व्या…

Read More Read More

मस्कची मस्क्युलर कार

मस्कची मस्क्युलर कार

अमेरिकेला बंदुका आणि कारचं वेड आहे. दर १० अमेरिकन माणसांत १२ बंदुका असतात. कारच्या बाबतीत बोलायचं तर दर १० माणसांत ९ जणांकडं कार असते. लोकसंख्येमधे अर्धी अधीक संख्या मुलांची असते, त्यांच्याकडं कार नसते. त्यामुळं अमेरिकेतल्या वयात आलेल्या १० माणसांत १५ तरी कार असतात असं म्हणायला हरकत नाही. बंदुक आणि कार ही अमेरिकेची राष्ट्रीय चिन्हं आहेत. त्यांनी ती अजून झेंड्यावर कशी घेतली नाहीत असा प्रश्न पडतो. अमेरिकेची अर्थव्यवस्था कार भोवती फिरते. फोर्ड कंपनीची गंमत. फोर्डनं गाड्या इतक्या स्वस्त तयार केल्या की…

Read More Read More