क्रॉसिंग. एका भाचीशोधाची गोष्ट
क्रॉसिंग ही लेवन अकिन या स्वीडिश दिक्दर्शकाची फिल्म आहे. फिल्ममधली पात्रं जॉर्जियन, तुर्की आणि इंग्लीश भाषेत बोलतात. लिया नावाची एक निवृत्त बाई आहे. जॉर्जियातली. जॉर्जिया हा तुर्कस्तानचा शेजारी देश आहे. तिची बहीण वारलीय. टेकला नावाची बहिणीची मुलगी, लियाची भाची, लहान असतानाच घरून गायब झाली. ती ट्रान्स होती. तिचं ट्रान्स असणं बाटुनी या छोट्या सनातनी गावाला आवडत नाही, याचा त्रास टेकलाच्या आई वडिलांना आणि लियाला होत असतो. म्हणून तर टेकला गायब असते. लिया टेकलाला शोधायचं ठरवते. तिच्याबद्दल येवढंच माहित असतं…