रविवार/दुबई दुबई
३० नोव्हेंबर २३ रोजी पर्यावरण रक्षण परिषदेसाठी जगभरातली ८० हजार माणसं दुबईत गेली. ही माणसं साधीसुधी नव्हती. कोणी तेल कंपनीचा मालक. कोणी कुठल्याशा देशाचा अर्थमंत्री. कोणी कुठल्याशा बँकेचा चेअरमन. कोणी झेंडाझोळी घेऊन निदर्शनं करणारा. या लोकांसाठी एक छोटं शहरच दुबईनं उभारलं होतं. रहाणं, मौज, कॉन्फरन्सेस, खाजगी वाटाघाटी. जागोजागी स्विमिंग पूल. दारू मिळेल पण ती तुमच्या हॉटेलात, अगदी खाजगीत. दुबई अशी शहरं उभी करते.नंतर त्या शहरांचं काय होतं कुणास ठाऊक. वर्ल्ड कप, ऑलिंपिक, अशा जागतीक गोष्टीसाठी दुबई कायम तयार असते. परिषदेतली…