भ्रष्ट सत्तेचा अंत: बांगला देश
बांगला देशाच्या पंतप्रधान शेख हसीना यानी राजीनामा दिलाय, त्या देश सोडून पळून गेल्यात. बांगला देशातल्या विद्यार्थी आंदोलनात २५० पेक्षा अधीक माणसं पोलिसांच्या गोळ्याना बळी पडली आहेत. ६० हजार माणसं तुरुंगात पोचली आहेत. ढाक्क्याच्या उपनगरात अनेक विद्यापीठं आहेत. अमेरिकेत एकाद्या विश्वशाळेचा पसारा येवढा असतो की ते सारं गाव विश्वशाळेचं असतं. तसंच काहीसं ढाक्क्याच्या उपनगरात झालंय. विद्यार्थीच विद्यार्थी. त्यांची हॉस्टेल्स, त्यांनी केलेल्या भाड्याच्या खोल्या, सारं उपनगर विद्यार्थीमय झालेलं. विद्यार्थी रस्त्यावर आली की सारं शहर ढवळून निघतं. विद्यार्थी रस्त्यावर आले कारण सरकारचं आरक्षण…