सिनेमे /मेगॅलोपोलिस
मेगॅलोपोलिस फ्रान्सिस कोपोलाचा मेगॅलोपोलिस कॅन्झमधे नुकताच प्रदर्शित झालाय. इसवीपूर्व ६० सालचं कथानक. रोम. सिसेरो (विन्स्टन चर्चील यांचा आवडता हीरो) हा राज्यकर्ता. कॅटालिना हा नेता त्याचं राज्य उलथवून टाकण्याचा कट रचतो. कॅटालिनाचं म्हणणं की सिसेरोचं राज्य लुटारूंचं आहे. कॅटालिनानं सिसेरोचं राज्य उलथवून त्या ठिकाणी गरीबांचं राज्य आणण्याचा प्रयत्न केला. फ्रान्सिस कोपोला या नामांकित दिक्दर्शकानं वरील कथानक २१ व्या शतकातल्या अमेरिकेत आणून ठेवलंय. न्यू यॉर्क उध्वस्थ झालंय. एक आर्किटेक्ट न्यू यॉर्क एकविसाव्याच्याही पलिकडल्या शतकात शोभेल असं न्यू यॉर्क वसवायचा प्रयत्न करतो. हा…