जनतेच्या मनात काय दडलंय?
भाग २ यात्रेचा एक मुक्काम शंकर नगर परिसरात होता. १९८० च्या सुमारास त्या काळातले मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे जावई भास्करराव पाटील खतगावकर यांनी या परिसरात साखर कारखाना उभा केला. त्यावरून या परिसराचं नाव शंकर नगर असं पडलं. सुमारे १५०० माणसांना या कारखान्यामुळं काम मिळत होतं. प्रारंभी तो चांगला चालला, २००५ साली बंद पडला, रोजगार गेला. कारखान्यावरचं सहकारी बँकेचं कर्ज अजूनही फिटलेलं नाही. कारखान्याच्या परिसरात खतगावकर यांनी शिक्षण संस्था उभ्या केल्या. त्या संस्था मात्र व्यवस्थित चालतात. कारखान्याच्या परिसरात यात्रेकरूंच्या रहाण्याची गाड्या पार्क करण्याची,…