सिनेमा. ॲटमबाँबचा हिचकॉकनं केलेला वापर
सिनेमा. ॲटमबाँबचा हिचकॉकनं केलेला वापर ओपनहायमरच्या ॲटम बाँबवर सिनेमा करायचं १९४५ साली आल्फ्रेड हिचकॉकच्या डोक्यात होतं. हिचकॉकच्या कानावर होतं की न्यू मेक्सिकोमधे अमेरिकन लष्करानं कसला तरी सॉलिड प्रोजेक्ट उभारलाय आणि त्यात ॲटम बाँब तयार करत आहेत. एका लेखक मित्रानं हिचकॉकला सांगितलं की तो प्रोजेक्ट इतका गुप्त आहे की कोणी एकदा का आत गेला की बाहेर येत नाही. हिचकॉक या बाबत एका वैज्ञानिकाला भेटला, बाँबची चौकशी केली. वैज्ञानिक म्हणाला ‘कसलं काय बाँबचं घेऊन बसलात. अणूचा स्फोट करणं वगैरे गोष्ट शक्यच नाहीये…’…