पुस्तकं/चार्ली चॅप्लीनचा छळ
Charlie Chaplin vs. America: When Art, Sex, and Politics Collided. Scott Eyman. {} नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ओपनहायमर या चरित्रपटात वैज्ञानिक ओपनहायमर याना अमेरिकन पोलिस आणि गुप्तचरांनी कसं छळलं त्याचं चित्रीकरण पहायला मिळालं. आता नुकत्याच प्रकाशित झालेल्या स्कॉट आयमन यांच्या पु्स्तकात एफबीआयनं चार्ली चॅप्लीनला कसं छळलं याची गोष्ट सांगितलीय. आयमन चित्रपट समीक्षक आहेत. नामांकित निर्माते, दिक्दर्शक, नट यांच्याशी त्यांचा घनिष्ट परिचय असे.चित्रपट व्यवहार आणि व्यवसाय त्यांना आतून बाहेरून माहीत आहे. प्रस्तुत पुस्तकाचा काळ अमेरिकेतला १९४० च्या आसपासचा. दी ग्रेट डिक्टेटर…