सिनेमे/माएस्ट्रो
माएस्ट्रो लिओनार्ड बेर्नस्टाईन (१९१८-१९९०) हे युरोपातलं एक नामांकित व्यक्तिमत्व होतं. माएस्ट्रो हा बेर्नस्टाईनचा जीवनपट आहे. बेर्नस्टाईननं (लेनी) जेएफ केनेडींच्या स्मृतीप्रीत्यर्थ आणि बर्लीन भिंत कोसळल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी संगित रचना केल्या. त्यानं बीथोवन, शास्कोटोविच इत्यादींच्या रचना कंडक्ट केल्या. त्यानं विश्वशाळेत संगित शिकवलं आणि टीव्हीवर संगिताचे कार्यक्रम केले. हे सर्व सांगितिक उद्योग करत असतानाच तो वियेतनाम युद्धाला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरला, मानवी अधिकारावरच्या आक्रमणांचा विरोध केला. कंडक्टर आजारी पडल्यामुळं आयत्या वेळी काही तासांच्या नोटिशीत, तयारी न करता, लेनीला एक कार्यक्रम कंडक्ट करावा…