पुस्तक. हिटलरपुढं शरणागतीचं अवघड फ्रेंच दुखणं
देशांच्या, समाजांच्या काही खाचा अवघड असतात ज्यात पडायला देश तयार होत नाही. कारण त्या खाचेतल्या अंधारात खोलवर गेलं तर देशाचं लाज वाटावं असं वागणं प्रकाशमान होतं. ❖ २३ जुलै १९४५ ची दुपार. मरणाच्या उकाड्यात पॅरिसमधल्या हाय कोर्टात मार्शल पेतां यांच्यावर देशद्रोहाचा खटला सुरु झाला. पेतां हे एकेकाळी फ्रान्सचे सरसेनानी होते, हीरो होते. सामान्यपणे आरोपीला पिंजऱ्यात उभं केलं जातं. या खटल्यात मात्र मार्शल पेतां यांना बसण्यासाठी मखमली उशीनं मढवलेलं सिंहासनासारखं आसन देण्यात आलं होतं. त्यांच्यासमोर मखमली उशीनं मढवलेलं एक टेबल ठेवण्यात…