सिनेमा. एडवर्ड स्नोडेनवरचा माहितीपट
सिनेमा. सिटिझन फोर सरकारची कुलंगडी बाहेर काढणं म्हणजे देशद्रोह. लॉरा पॉइट्रसला निनावी निरोप आला, भेटायचंय. पॉईट्रस सामाजिक प्रश्नांवर माहितीपट करतात. निरोप देणाऱ्यानं आपलं नाव वा ठावठिकाणा सांगितला नाही. मेसेजेस यायला लागले. मेसेज एनक्रिप्टेड असत. वाचता येत नसत. निरोप पाठवणारा आपण कोण आहे ते सांगत नसे, फोनवर स्वतः बोलायला तयार नसे. एके दिवशी तो माणूस फोनवर बोलला. नाव सांगितलं नाही. ‘तू माझ्यावर फिल्म करावीस असं मला वाटतं. सरकार नागरिकांवर बेकायदा पाळत ठेवतं याला तू विरोध करतेस. त्यामुळं मला वाटलं की मी…