देशात जन्मलेले नागरीक रातोरात देशद्रोही ठरवले जातात…
अमेरिकेतल्या जपानी नागरिकांना अमेरिकेनं देशद्रोही ठरवून चार वर्षं तुरुंगात लोटलं होतं त्याला कालच्या डिसेंबरमधे ८० वर्षं झाली. ७ डिसेंबर १९४१ रोजी जपाननं पर्ल हार्बर या बंदरातल्या अमेरिकेच्या नाविक तळावर हल्ला केला. जपान, अमेरिका युद्ध सुरु झालं. अमेरिकन सरकारनं लगोलग अमेरिकेत रहाणाऱ्या तमाम जपानी लोकांना देशद्रोही म्हणून जाहीर करून टाकलं. पर्ल हार्बर हे अमेरिकेच्या अधिपत्याखालच्या हवाई बेटांमधील एक बेट. हवाई बेटं आपलीच आहेत असा जपानचा दावा होता. १९४० च्या आधीची दहा वर्षं जपान आपलं साम्राज्य चीन, इंडोचीन, इंडोनेशिया, फिलीपीन्स इत्यादी विभागात…
प्रिन्स अँड्र्यूज बलात्कारी?
ब्रीटनचा राजा होण्याच्या रांगेत नवव्या नंबरवर असणारे राजपुत्र अँड्र्यूज अमेरिकेत एका खटल्यात अडकले आहेत. त्यांच्यावर बलात्काराचा आरोप आहे..
खोटारडा पंतप्रधान
बोरिस जॉन्सन यांच्या अधिकृत घरामधे, १० डाउनिंग स्ट्रीटमधे, गेल्या वर्षी ख्रिसमसची पार्टी झाली. पार्टीत चाळीस ते पन्नास माणसं हजर होती. पार्टी म्हटल्यावर जे काही होत असतं ते या पार्टीत झालं. सरकारी अधिकारी त्या पार्टीत होते. खुद्द बोरिस जॉन्सनही त्या पार्टीत काही वेळ सहभागी झाले होते. ज्या दिवशी पार्टी झाली त्याच दिवशी इंग्लंडमधे पाचेकशे माणसं कोविडनं मेली होती. पार्टीच्या आधी दोनच दिवस सरकारनं जनतेला सांगितलं होतं की कोविडपासून सावध रहावं, समारंभ करू नयेत, पार्ट्या करू नयेत, लोकांनी एकत्र येऊ नये, ख्रिसमस साजरा…
धर्म आणि राजकारण सांगड,डेस्मंड टुटु
डेस्मंड टूटू वयाच्या नव्वदाव्या वर्षी वारले. टूटूंना १९८४ साली शांततेचं नोबेल पारितोषिक मिळालं होतं. द.आफ्रिकेत वर्णद्वेषी-वर्णभेदी सरकार हटवून त्या ठिकाणी लोकशाही सरकार स्थापण्यात त्यांनी केलेली मदत (नेल्सन मंडेलांना) हे नोबेल पारितोषिकासाठी निमित्त, उल्लेखनीय कारण होतं. टूटू होसा या जमातीत जन्मले. (मंडेलाही त्याच जमातीचे) कॉलेज पार पडल्यावर ते धर्मशिक्षणाकडं वळले. इंग्लंडमधे त्यांनी अँग्लिकन चर्चमधे शिक्षण घेतलं आणि बिशप झाले. जोहानेसबर्गच्या उपनगरातल्या आपल्या वस्तीत त्यानी कामाला सुरवात केली. पण नंतर कित्येक वर्षं ऊच्च शिक्षण व चर्चच्या कामासाठी ते इंग्लंडमधेच वास्तव्य करून होते. या…
सत्यशील देशपांडे यांची मैफिल
सत्यशील देशपांडे यांनी ग्रंथालीच्या वाचक दिनासाठी जमलेल्या श्रोत्यांपुढं संगितातील सौंदर्यस्थळं सादर केली. मागे एकदा त्यांनी पुलंच्या साहित्यातील संगीत असा विषय मांडला होता. सत्यशील देशपांडे अनेक अंगांनी संगिताला भिडतात, संगिताच्या अनंत पैलूंचा माग काढतात. अनेक नामांकित गायकांचं गाणं त्यांनी ऐकलंय, त्यांच्याशी संगित या विषयावर ते बोललेत आणि कित्येक म्हणजे कित्येक तासांचं संगित त्यांनी साठवून ठेवलं आहे. विषय मांडत असताना ते बोलतात आणि गातात. एक मार्मिक वाक्यं सत्यशील देशपांडे उद्गारले. बॅले हे नृत्य करता येण्यासाठी जिम्नॅस्टिक्स/ॲक्रोबॅटिक्स यावं लागतं, जिम्नॅस्टिक्स/ॲक्रोबॅटिक्स म्हणजे बॅले नव्हे. संगिताची आठ अंगं मानली जातात. ताल,…
वंशवाद. माणसानंच जन्माला घातलाय.
How to Argue With a Racist: History, Science, Race and Reality. Adam Rutherford. 224 pages Publisher : W&N. || पंधरासोळाव्या शतकातल्या अज्ञानातून जन्मलेला वंशवाद अजूनही माणसं कवटाळतात या वास्तवाचा वेध ॲडम रुदरफोर्ड प्रस्तुत पुस्तकात घेतात. ” तुम्ही जिथून आला तिथं परत जा…आम्हाला तुम्ही अमेरिकेत नको आहात.. काळे लोक तुम्हाला शेजारी म्हणून हवेत काय.. ज्यू परके आहेत, ते आमची जागा घेऊ पहात आहेत…” असं आता अमेरिकेत जाहीरपणे बोललं जातंय. आफ्रिकन, मुसलमान, भारतीय, आशियन, मेक्सिकन असं एकाद्या समाजाचं वर्णन करून त्या समाजाला अमेरिकेत आता उघडपणे वेगळं करून हाकलून देण्याची…
हेरगिरी करणाऱ्या माणसाचं आत्मकथन
A DROP OF TREASON Jonathan Stevenson University of Chicago Press || अमेरिकेनं देशद्रोही असा शिक्का मारलेल्या Philip Agee या माणसाचं प्रोफाईल प्रस्तुत पुस्तकात आहे. एका परीनं ते धाडस आहे असंच म्हणायचं. फिलिप एजी सीआयएमधे केस ऑफिसर होते, हेर होते. अमेरिकेचं देशोदेशींची सरकारं उलथवण्याचं परदेश धोरण मान्य नाही असं कारण सांगत, उघडपणे वाच्यता करत त्यानी नोकरी सोडली आणि उरलेलं आयुष्य अमेरिकेबाहेर काढून त्यांनी अमेरिकन धोरणांचे वाभाडे काढले. जोनाथन स्टीवन्सन हे प्रस्तुत पुस्तकाचे लेखक संरक्षण, परदेश संबंध, दहशतवाद, इस्लामी प्रभाव या विषयांचे जाणकार आहेत….
माओ झेडॉंगच्या भीषण कारकीर्दीचं चित्रण
World Turned Upside Down यांग जिशेंग यांच्या World Turned Upside Down या नव्या पुस्तकाची दखल पश्चिमी देशातली माध्यमं सध्या घेत आहेत. या पुस्तकात लेखकानं माओच्या १९६६ ते १९७६ च्या दरम्यान झालेल्या सांस्कृतीक क्रांतीवर सविस्तर लिहिलं आहे. माओच्या राजकीय जीवनातला पहिला टप्पा लाँग मार्चचा. खेड्यापाड्यातल्या शेतकऱ्यांना संघटित करून माओनं चीनच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत दीर्घ यात्रा काढली. या काळात माओनं पक्ष संघटित करून देशभर पसरला. परिणामी माओ चीनचा नेता झाला. दुसरा टप्पा होता चीनच्या झटपट आर्थिक विकासाचा. हनुमानासारखा सूर्य गिळायचा प्रयत्न माओनं केला. जगात कोणीही…
लेनिन असा होता
The Spark That Lit the Revolution Lenin in London and the Politics that Changed the World Robert Henderson Bloomsbury Publishing || फार गमतिशीर पुस्तक आहे. लेनिनचा लंडनमधील मुक्काम असा पुस्तकाचा विषय आहे. झारशाहीविरोधात बंड करणाऱ्या क्रांतीकारकांचा नेता लेनिन.झारनं त्याला सैबेरियात विजनवासात हाकललं. विजनवास संपल्यावर लेनिन जर्मनी, बेल्जियम, स्वित्झर्लंड अशी मजल दर मजल करत लंडनमधे गेला, १९०२ साली. त्यानंतर १९११ पर्यंत लेनिन जगात इतरत्र जात असे आणि पुन्हा लंडनमधे येत असे. एकूण सहा मुक्काम लंडनमधे झाले, निरनिराळ्या घरांत. इक्रा नावाचं एक…