पुस्तक. प्लेगनं मानवी जीवनाला वळण लावलं
ब्लॅक डेथ हे पुस्तक २००४ साली प्रसिद्ध झालंय. या पुस्तकात १३४७ ते १३५२ या काळात झालेल्या प्लेगच्या महासाथीचा अभ्यास आहे. या कालखंडालाच ब्लॅक डेथचा कालखंड म्हणतात. त्या आधी इसवी ५४१ मधे प्लेगची एक साथ होऊन गेली होती. या दोन्ही साथींचा अभ्यास प्रस्तुत पुस्तकात केलेला आहे. तुम्ही विचाराल, की चौदाव्या शतकातल्या साथीवरचं २००४ साली प्रसिद्ध झालेलं पुस्तक आता कां वाचावं? वाचावं, कारण त्यातून साथ या आरोग्य संकटातून समाज काय शिकला ते कळतं. नुकतीच कोविडची साथ येऊन गेली आणि समाज त्यातूनही…