सद्दाम हुसेन यांच्यासाठी केक

सद्दाम हुसेन यांच्यासाठी केक

  भारतीय फौजा हैदराबाद संस्थानात घुसल्या, हैदराबाद मुक्त झालं. हैदराबाद मुक्ती संग्राम दाखवायचा झाला तर या घटनेच्या भवती चित्रपट-माहितीपट करता येतो.  भारतीय सेना संस्थानात घुसल्याची बातमी कुरुंदा या गावात पोचली. तिकडं भारतीय सेनेची कारवाई सुरु होती इकडे नांदेडमधल्या कुरुंदा गावात आनंदोत्सव साजरा झाला. तो दिवस नरहर कुरुंदकर यांनी एका लेखात चितारलाय. त्या दिवसावर एक चित्रपट होऊ शकतो. कुरुंदा गावातलं एकादं कुटुंब, त्या कुटुंबात घडणाऱ्या घटना चित्रपटात दिसतील. कुरुंदा गावातली घरं दिसतील, त्यांचं जगणं दिसेल. त्यात ना भारतीय सेना दिसेल, ना…

Read More Read More

हा अमानुष वेडेपणा थांबायला हवा. 

हा अमानुष वेडेपणा थांबायला हवा. 

हा अमानुष वेडेपणा थांबायला हवा.  ऑस्ट्रेलियात सिडनी शहरात समुद्र किनाऱ्यावर ज्यू माणसं हनुक्का सणाचा आनंद लुटत होते. दोन माणसांनी दुरवरून त्यांच्यावर बंदुक चालवली. ४० जणं जखमी झाले, १५ जणांचा मृत्यू झाला. घटनास्थळापासून काही अंतरावर एका कारमधे आयईडी स्फोटकं सापडली. बाप आणि मुलगा अशी हल्लेखोरांची जोडी होती. बाप १९९८ मधे ऑस्ट्रेलियात स्थलांतरीत होऊन नागरीक झाला होता, २४ वर्षाचा त्याचा मुलगा ऑस्ट्रेलियात जन्मल्यानं जन्मजात नागरीक झाला होता. त्यांच्या घरी असलेल्या आणि त्यांनी वापरलेल्या म्हणून ६ बंदुका त्यांच्याकडं होत्या. या बंदुका लष्करी उपयोगासाठी…

Read More Read More

दे तेल पेलो.

दे तेल पेलो.

छोटुश्शा देशातल्या इटुकल्या समाजात झालेला चित्रपट.महाराष्ट्र ३ लाख चौकिमी आहे. पोर्टो रिको हा देश ३ हजार चारशे किमी आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या आहे १३.७ कोटी; पोर्टो रिकोची लोकसंख्या आहे ३ लाख २ हजार. पोर्टो रिकोत २०२३ साली १४ फिल्म झाल्या, २०२४ साली ७ फिल्म झाल्या. २०२५ साली किती फिल्म झाल्या तो आकडा मिळत नाही पण जितक्या कितक्या फिल्म झाल्या असतील त्यातली ‘दे तेल पेलो’ गोव्यातल्या महोत्सवात दाखवली गेली.‘दे तेल पेलो’ चं मराठीतलं स्वैर भाषांतर होईल खाण तशी माती.नात आणि आजोबा यातल्या…

Read More Read More

सोळाच्या आत सोशल मिडिया मज्जाव

सोळाच्या आत सोशल मिडिया मज्जाव

 ऑस्ट्रेलियानं १६ वर्षाखालील मुलांच्या सोशल मिडिया वापरावर बंदी घातलीय. सोशल मिडियाच्या वापरामुळं मुलांचं नुकसान होतं;  मुलांची विचारशक्ती कुंठते, त्यांच्यात मानसीक विकृती निर्माण होतात; असं सरकारला वाटतं.  नवीन कायद्यातली तरतूद अशी :  सोशल मिडिया ॲप उघडलं की उघडणाऱ्याचं वय तपासलं जावं, सोळाच्या आत असेल तर त्या व्यक्तीला ते ॲप उघडता येणार नाही. सोशल मिडिया कंपन्यांनी कायदा पाळला नाही, पळवाटा काढल्या तर  मिडिया कंपन्यांना ३.३ कोटी डॉलरचा दंड सरकारनं योजला आहे. एक सूचना होती की वय तपासणं, मिडियातला मजकूर तपासणं, मुलाना पाहू…

Read More Read More

चित्रपट : सेफ हाऊस. विषण्ण करणारा अनुभव.

चित्रपट : सेफ हाऊस. विषण्ण करणारा अनुभव.

नेटकंच पार पडलेल्या (२०२५) गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘सेफ हाऊस’ या चित्रपटाची उत्कृष्ट चित्रपट म्हणून निवड झाली.नॉर्वेजियन एरिक स्वेन्सनने या चित्रपटाचं दिक्दर्शन केलंय. चित्रपट युनेस्को आणि आयसीएफटी या दोन संस्थांची निर्मिती आहे.  सेफ हाऊस म्हणजे सुरक्षित घर. सेफ हाऊस या शब्दाना एक विशिष्ट अर्थ आहे.  गुप्तचरांना कोणाला तरी मारायचं असतं, कुठं तरी घातपात घडवायचा असतो. त्यासाठी त्यांना आपली ओळख, नावगाव पुसावं लागतं, लोकांच्या नजरेत भरणं टाळावं लागतं.  उघड झाले की मेलेच. अशा गुप्तचरांना एका सेफ हाऊसमधे ठेवलं जातं. सेफ हाऊसमधे …

Read More Read More

पुतीन मोदी भेट, रशिया भारत भेट.

पुतीन मोदी भेट, रशिया भारत भेट.

पुतीन सप्टेंबर महिन्यात मोदींना भेटले होते. लगोलग दोन महिन्यांनी दोघं दिल्लीत भेटले. लगबग कशासाठी? युक्रेन युद्धानं केलेल्या गोचीतून पुतीनना वाट काढायचीय. पुतीनना त्यांची अर्थव्यवस्था सांभाळायचीय; पुतीनना आपण जगात एकटे पडलेलो नाही आपल्याला मित्र आहेत हे जगाला दाखवायचंय. युद्ध महाग पडतय. दररोज किमान पाच हजार रशियन सैनिक मरत आहेत. पैसा वारेमाप खर्च होतोय. भारत आणि चीननं रशियन तेल व इतर गोष्टींची खरेदी चालवलीय, तेवढ्यावर रशिया तग धरून आहे. युरोपीय देश हळूहळू रशियन तेल आणि गॅस कमी वापरू लागलेत, पुढल्या वर्षात ते…

Read More Read More

महिला प्रेसिडेंटशीच अती प्रसंग करणारे….

महिला प्रेसिडेंटशीच अती प्रसंग करणारे….

 मेक्सिको नाना तऱ्हेच्या दबाव आणि प्रेरणांना तोंड देतोय. बाहेरून ट्रंप दम काढत आहेत. अमेरिकेनं मेक्सिकोतून येणाऱ्या जहाजांवर बाँब फेकले. २१ जहाजं. त्यातून म्हणे ड्रग्ज अमेरिकेत येत होती. ८३ माणसं मेली. कित्येक दशकं मेक्सिकोतून माणसं आणि ड्रग्ज अमेरिकेत येतात. मेक्सिकोची राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था ड्रग माफिया चालवत असतात.  एकदा अमेरिकेनं ड्रगवाल्या वनस्पती नष्ट करण्यासाठी मेक्सिकोमधे आपले सैनिक घुसवले. अमेरिकन विमानं हवेतून आग किवा रसायनं फवारून ड्रग देणारी पिकं नष्ट करत असत. आड येणारी माणसंही अमेरिका मारत असे. त्याचा उपयोग होत नसे. ड्रग…

Read More Read More

दारोदार डिलिव्हरी आणि लेखन

दारोदार डिलिव्हरी आणि लेखन

 हु अन्याननं IDeliver Parcels in Beijing हे पुस्तक २०२३साली लिहिलं. दोन वर्षात त्या पुस्तकाच्या २० लाख प्रती संपल्या. त्या वर्षीचं  सर्वोत्कृष्ट लेखक पारितोषिक त्याला मिळालं. हुचं ते पहिलंच पुस्तक.  हु लेखक नाही. पुस्तक लिहिल्यामुळं तो लेखक झालाय. हु बीजिंगमधे वस्तू पोचवणारा डिलिवरीवाला आहे. नागरीक वस्तू मागवतात. गोदामातून वस्तू गोळा करणं आणि गिऱ्हाईकांकडं पोचवणं हे त्याचं काम. एक वस्तू पोचवण्याचे २५ रुपये त्याला मिळतात. जगण्यासाठी त्याला दिवसाचे ११ तास काम करावं लागतं. सोपं काम नव्हे. खाद्य वस्तू असेल तर ती काही…

Read More Read More

भुतांच्या असण्यावर लोकांचा विश्वास

भुतांच्या असण्यावर लोकांचा विश्वास

भुतांच्या असण्यावर लोकांचा विश्वास  ख्रिस्ती जगात ३१ ऑक्टोबरला हॅलोविन साजरा झाला. घरोघरी लोकांनी भोपळ्यात भुतं कोरली, घराबाहेर भुतं आणि हडळींच्या प्रतिमा टांगल्या. हॅलोविनच्या रात्री आत्मे भुतांच्या रुपांत किंवा अरूप पृथ्वीवर येत असतात. त्यांचं येणं साजरं करणं हा असा या सणाचा उद्देश. अमेरिकेत आणि युकेमधे हा सण साजरा होतो. मुलं खुष असतात. भुतं, हडळी पाहून ती एक थरार अनुभवतात. भुतांच्या गोष्टींची पुस्तकं त्या आठवड्यात खूप खपतात. आया मुलांना मोठ्या टायपातली ती पुस्तकं वाचून दाखवतात. सकाळी मुलं कॅंडी घेऊन घरोघरी जातात. माणसं…

Read More Read More

विकीपेडियाचा निर्माता जिम्मी वेल्स

विकीपेडियाचा निर्माता जिम्मी वेल्स

विकीपेडियाचा निर्माता जिम्मी वेल्स ६० वर्षाचा झाला. त्याचं विकीपेडिया २५ वर्षाचं झालं.  विकीपेडिया हा खुल्ला विश्वकोष आहे. त्यात आता ३०० भाषांत ६५ कोटी लेख-नोंदी आहेत. महिन्यात १ अब्ज माणसं हा कोष वापरतात. विकीपेडिया मोफत आहे.  एकेकाळी ब्रिटानिका, पियर्स इत्यादी अनेक खंडांचे   विश्वकोष होते. दर काही काळानं त्यात नव्या नोंदी होत, पुरवण्या निघत. लोकांची कपाटंच्या कपाटं विश्वकोषानं भरलेली असत. तो विकत घेणं परवडत नसे, पुस्तकालयात जाऊन तो वाचावा लागे. जिम्मी वेल्स मुळात अमेरिकन. गेली काही वर्षं तो लंडनमधे स्थायिक झालाय….

Read More Read More