इराणी स्त्रियांचा सरकारी अरेरावीला विरोध
इराणमधे स्त्रिया रस्त्यावर आल्या. त्यानी बुरखे काढून फेकले, बुरख्यांची होळी गेली. अनेक स्त्रियांनी केस कापले, कापलेले केस सरकारला अर्पण केले. तिथल्या सरकारला स्त्रियांचं हे वागणं पसंत नाही. तिथलं सरकार थियोक्रॅटिक आहे. इराण हे धर्मराष्ट्र आहे. तिथल्या इमामांना जो काही इस्लाम समजतो त्या इस्लामवर इराण चालतो. इस्लाम वगळता इतर धर्म इराणला मान्य नाहीत, समाज इस्लामी धर्मविचारानंच चालला पाहिजे असं इराणी सरकारला वाटतं. धर्माला सार्वजनिक जीवनात मर्यादित स्थान असावं असं मानणाऱ्या विचाराला इराणमधे थारा नाही. इराणच्या इमामांना समजलेल्या इस्लामनुसार स्त्रियांचे केस पुरुषांना दिसले तर पुरुषांची…