पुस्तक. चिप वॉर.
प्रस्तुत पुस्तकाचा विषय आहे ‘चिप’. विषय तांत्रीक आहे पण लेखक या चिपची गोष्ट एकाद्या थरारक चित्रपटासारखी सांगतो. चिप.म्हणजे अगदी पातळ चकती. तिच्यावर एक किंवा अधिक सर्किट्स कोरलेली असतात. प्रत्येक सर्किटमधे सेमीकंडक्टर व इतर घटक एकत्र केलेले असतात. माणूस या चिपकडं माहिती पाठवतो, त्या माहितीचं रुपांतर आज्ञेत कसं करायचं तेही चिपला सांगितलेलं असतं. ही आज्ञा नंतर एकाद्या यंत्राकडं, उपकरणाकडं, उत्पादन प्रक्रियेकडं जाते आणि ते यंत्र-उपकरण-उत्पादन व्यवस्था आपण नेमून दिलेलं काम करते. बैलगाड्या तयार करणं आणि वापरणं. करवत-रांधा हातानं वापरून सुतारानं…