आणखी एक खोटारडा राष्ट्रपती झालाय, फिलिपिन्समधे.
१९८६ साली फर्डिनंड मार्कोस, त्या वेळेचे फिलिपिन्सचे अध्यक्ष, देश सोडून हवाई बेटांत पळून गेले. कारण त्यांनी केलेला घोर भ्रष्टाचार उघड झाला होता, जनता रस्त्यावर उतरली होती, पोलिसही त्यांचं लोकांच्या रागापासून संरक्षण करू शकत नव्हते. पळून जाताना मार्कोस पंचवीस रांजण भरून सोनं आणि पंचवीस खोके भरून रोख रक्कम बरोबर नेली होती. पळून जाताना त्यांचा मुलगा बाँगबाँग मार्कोस त्यांच्या सोबत होता. मार्कोसनी सत्ता सोडल्यावर त्यांचा रहाता राजवाडा लोकाना पहायला मिळाला. घरातल्या नळाच्या तोट्या, दिव्याची बटणं, दरवाजांच्या कड्या, बाथ टब इत्यादी साऱ्या गोष्टी सोन्याच्या…