लेनिन असा होता
The Spark That Lit the Revolution Lenin in London and the Politics that Changed the World Robert Henderson Bloomsbury Publishing || फार गमतिशीर पुस्तक आहे. लेनिनचा लंडनमधील मुक्काम असा पुस्तकाचा विषय आहे. झारशाहीविरोधात बंड करणाऱ्या क्रांतीकारकांचा नेता लेनिन.झारनं त्याला सैबेरियात विजनवासात हाकललं. विजनवास संपल्यावर लेनिन जर्मनी, बेल्जियम, स्वित्झर्लंड अशी मजल दर मजल करत लंडनमधे गेला, १९०२ साली. त्यानंतर १९११ पर्यंत लेनिन जगात इतरत्र जात असे आणि पुन्हा लंडनमधे येत असे. एकूण सहा मुक्काम लंडनमधे झाले, निरनिराळ्या घरांत. इक्रा नावाचं एक…