ट्रंप खूप बिझी असतात
ट्रंपनी बीबीसीवर १अब्ज डॅालरचा अब्रू नकसानीचा खटला भरू असं म्हटलंय. बीबीसीनं आपला बदनामी केलीय असं ट्रंप यांचं म्हणणं आहे. बीबीसीच्या ॲाक्टोबर २०२४ च्या पॅनोरामा कार्यक्रमात ट्रंप यांचं एक भाषण दाखवण्यात आलं होतं. त्यात ट्रंप कॅपिटॅाल हिलवरच्या संसदेवर हल्ला करायला गेलेल्या दंगेखोरांना हल्ला करण्याची चिथावणी देताना दिसले. गेलं वर्षभर याचा पत्ता ट्रंप यांना नव्हता. हा कार्यक्रम त्यांनी पाहिलाही नसावा. गेल्या आठवड्यात ब्रीटनमधल्या एका पेपरनं हे प्रकरण उकरून काढल्यावर ट्रंपना जाग आली. प्रकरण उकरलं गेलं याची कारणंही वेगळी आहेत. गेली दोन तीन…