सिनेमा/माहिती पट. बाळकृष्ण विठ्ठल दोशी

सिनेमा/माहिती पट. बाळकृष्ण विठ्ठल दोशी

बाळकृष्ण विठ्ठल दोशी यांचं आर्किटेक्चर ❖ पारंपरीक नक्षीकाम नाही पण सूत्र हरवलेलं अत्याधुनिकही नाही असं आधुनिक आर्किटेक्चर दोशी यांनी केलं. ❖ मुंबईत आर्किटेक्ट लोकांनी एक चित्रपट जत्रा भरवली होती. त्यात आर्किटेक्चर या विषयाभोवती चित्रपट दाखवले गेले. चित्रपट म्हणजे माहितीपट होते. त्यातला एक माहितीपट होता बाळकृष्ण विठ्ठल दोशी यांच्यावर. दोशी २०२३ साली एक्याण्णवाव्या वर्षी वारले. दोशी पुण्यात जन्मले, अहमदाबादेत वाढले, मुंबई, लंडन आणि पॅरिसमधे शिकले, दिल्ली-बंगलोर-अहमदाबाद-इंदूरमधे त्यांनी वास्तू बांधल्या. माहितीपटात दोशी अहमदाबादच्या दाट वस्तीत फिरताना दिसतात. वय झालेलं असल्यानं एक मदतनीस…

Read More Read More

धर्म आणि राजकारण. मदरसे.

धर्म आणि राजकारण. मदरसे.

मदरशांचं रजिस्ट्रेशन आणि नियंत्रण करणारा कायदा पाकिस्तानात मंजूर झाला आहे. २०२३ मधेच संसदेनं तो मंजूर केला होता पण राष्ट्रपतीची सही झाली नव्हती. ती सही २०२४ च्या डिसेंबरमधे झाली. आधीपासून असलेल्या कायद्यात झालेल्या सुधारणेमुळं आता पाकिस्तानातल्या सर्व जुन्या मदरशांना आणि नव्यानं स्थापन होणाऱ्या मदरशांना नोंदणी करणं बंधनकारक आहे. नोंदणीनंतर मदरशात कोणते विषय शिकवले जातात, मदरशांना पैसे कुठून येतात याची नोंद सरकारकडं होईल.   ❖ पाकिस्तानातल्या मोठ्या शहरात जा. मोठ्या शहरातल्या गरीब विभागात जा. दाटीवाटीनं बांधलेल्या इमारतीमधून वाट काढत पुढं सरका. इमारतीतून…

Read More Read More

एमिलिया पेरेझ वादग्रस्त चित्रपट

एमिलिया पेरेझ वादग्रस्त चित्रपट

एमिलिया पेरेझ. ❖ एमिलिया पेरेझ या चित्रपटावर प्रेक्षक तुटून पडले. समीक्षक आणि सामान्य प्रेक्षकांपैकी अनेकांनी या चित्रपटाला एक स्टारही द्यायला नकार दिला. ऑस्करवाल्यांनी मात्र या चित्रपटाला १३ नामांकनं दिली आहेत. ❖ एमिलिया पेरेझ या सिनेमात नाट्य, थरार, रहस्य इत्यादी घटकांची रेलचेल आहे. एक ड्रग टोळीचा नायक आहे. त्याचं प्रचंड साम्राज्य आणि संपत्ती आहे. त्याच्या मनात येतं की आपण एक नवा अवतार घ्यावा आणि आपल्या पापांचं परिमार्जन करावं. लिंगपरिवर्तन आणि शरीर परिवर्तन करणाऱ्या डॉक्टरांकडं तो जातो. पुरुषाचा स्त्री होतो. दानशूर संत…

Read More Read More

गाझाची खरेदी रियल एस्टेटवाले ट्रंप करणार

गाझाची खरेदी रियल एस्टेटवाले ट्रंप करणार

 एका नव्या उत्पाताचं सूतोवाच अमेरिकेचे प्रेसिडेंट डोनल्ड ट्रंप यांनी केलं आहे. ट्रंप यांना गाझाची मालकी हवीय. ती मिळवण्यासाठी प्रसंगी ते अमेरिकेचं सैन्यही गाझात पाठवायला तयार आहेत. आज घडीला ते फक्त बोललेत, त्यांनी आपला विचार अमलात आणायचा प्रयत्न केला तर मध्य पूर्वेत काय होईल? सारं जग उलथापालथीत सापडेल? ट्रंप पहिल्या खेपेला प्रेसिडेंट झाले होते तेव्हां म्हणाले होते की इराकमधे आणि अफगाणिस्तानमधे सैन्य घुसवणं ही अमेरिकेची चूक होती, आपण तो उद्योग पुन्हा करणार नाही. आता दुसऱ्या खेपेत ट्रंप  गाझढा या दुसऱ्या एका…

Read More Read More

पुस्तक: तालिबान कां प्रभावी ठरतं?

पुस्तक: तालिबान कां प्रभावी ठरतं?

पुस्तक : RADIO FREE AFGHANISTAN लेखक : Saad Mohseni ❖ अफगाणिस्तान हे जगाला पडलेलं एक कोडंच आहे. तिथं काय चालतं ते कळत नाही. समजा ते कळलं तर ते तसं कां चाललंय ते कळत नाही. कारण अफगाणिस्तानबद्दल फारशी माहिती माध्यमांत येत नाही. ही अडचण पुस्तकं दूर करतात. साद मोहसेनी रेडियो फ्री अफगाणिस्तान या पुस्तकामुळं अफगाणिस्तान हे कोडं समजायला मदत होते. ❖ तालिबान कां पुसलं जात नाही.  ❖ अफगाणांना बाहेरच्या लोकांचं वर्चस्व सहन होत नाही. एकोणिसाव्या शतकात ब्रिटीशांनी अनेक लढाया केल्या, हरले,…

Read More Read More

अमेरिकन वाटेवर कॅनडा, देशीवादाची लाट

अमेरिकन वाटेवर कॅनडा, देशीवादाची लाट

कॅनडातलं वातावरण वेगानं बदललय. लोकांना उदारमती (लिबरल) राजकारण नकोय. त्यांना देशीवादाची भुरळ पडलीय.जगभर उमटलेल्या उजव्या लाटेत कॅनडा सापडला आहे. ❖ कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आपली  कारकीर्द पूर्ण होण्याच्या आधीच आपल्या पदाचा राजिनामा देऊन मोकळे झाले. निवडणुका तोंडावर आल्या आहेत, आपण पक्षप्रमुख आणि पंतप्रधानपदाचे उमेदवार राहिलो तर निवडणुकीत पराभव होईल याची खात्री त्यांना पटली. त्यांनी राजीनामा देताना पक्षानं दुसरा पंतप्रधान निवडावा असं म्हटलं आहे.  त्यांच्या जागी त्यांचा लिबरल पक्ष नवा नेता निवडेल आणि तो माणूस पंतप्रधान पदाचा दावेदार होऊन पुढील निवडणुकीला…

Read More Read More

ओकारी आणणारा सुंदर चित्रपट

ओकारी आणणारा सुंदर चित्रपट

चित्रपट सबस्टन्स. मुख्य भूमिका डेमी मूर  ‘डेमी मूर’ ला गोल्डन ग्लोब बक्षीस मिळालं,  ऑस्कर नामांकन मिळालय. ज्या सिनेमातल्या कामाबद्दल बक्षिस मिळालं तो सिनेमा आहे ‘सबस्टन्स’. या चित्रपटाला उत्तम चित्रपटाचं ऑस्कर नामांकन मिळालंय. चित्रपटाची दिक्दर्शिका कोरेली फार्जिट हिला दिक्दर्शनाचं नामांकन मिळालंय. डेमी मूर आज ६२ वर्षाची आहे. सबस्टन्स हा सिनेमा तिनं गेल्या वर्षी म्हणजे वयाच्या ६१ व्या वर्षी केला. या वर्षी अमेरिकेत टीव्ही, ओटीटी, सिनेमा, नाट्य, मालिका इत्यादी वर्गवारीत बक्षिसं मिळालेल्या अभिनेत्रीमधे पन्नाशीच्या पलिकडच्या बहुसंख्य आहेत. टायटॅनिकमधे गाजलेल्या केट विन्सलेटला एक…

Read More Read More

पुस्तक. मुल्ला गफूर ते टाटा

पुस्तक. मुल्ला गफूर ते टाटा

आजही टाटांचं नाव घेतलं की टॅक्सीवालाही भारावून जातो. अंबानींचं नाव घेतल्यावर मात्र लोक तोंड आंबट करतात. असं कां होतं.  ❖ पुस्तक : India before the Ambanis: A history of Indian Business, Money and Economy. लेखिका : Lakshmi Subramanian.  ❖  अंबानी यांच्या आधीचा भारत या शीर्षकावरूनच पुस्तकात काय असेल याचा अंदाज येतो.  धीरूभाई अंबानी हे आधुनिक भारतातले सर्वात मोठे बिझनेसमन. एडनमधे त्यांनी निर्यात व्यवसाय केला. त्यात  मिळालेले पैसे घेऊन १९५८ साली धीरूभाई भारतात परतले. बाजाराचं म्हणणं त्यांना उत्तम कळू लागलं होतं….

Read More Read More

दारू. डेंजर. पिणं कमी होईल?

दारू. डेंजर. पिणं कमी होईल?

इथून पुढं कधीही दारूच्या बाटलीवर कवटी हाडाचं चिन्हं दिसू शकेल. ज्या कुठल्या बाटलीत अल्कोहोलवालं पेय असेल अशा प्रत्येक बाटलीवर. त्या चिन्हाखाली लिहिलेलं असेल ‘दारू आरोग्याला हानीकारक  ठरू शकते. दारूमुळं सतरा प्रकारचे कॅन्सर संभवतात. दारु पिण्यापूर्वी विचार करावा.’  वरील सूचना सर्जन जनरलनं अमेरिकन काँग्रेससमोर ठेवली आहे; अमेरिकन काँग्रेसनं कायदा करावा असा त्या सूचनेमागचा उद्देश आहे.  सर्जन जनरल हे अमेरिकेच्या आरोग्याची काळजी घेणारं एक पद आहे. हज्जारो संशोधकांनी केलेल्या ताज्या आरोग्य विषयक संशोधनाच्या आधारे सर्जन जनरल वेळोवेळी अमेरिकन माणसाला सल्ला देत असतो….

Read More Read More

सिनेमा. सोवियेत बस स्टॉप.

सिनेमा. सोवियेत बस स्टॉप.

सोवियेत बस स्टॉप्स. माहितीपट.  आपला अनुभव. गावाच्या बाहेर, हमरस्त्याच्या कडेला एक बस स्टॉप असतो. परगावी जाणारी बस तिथं थांबते. गावातून बऱ्याच अंतरावर माणसं स्टॉपवर येतात. काही काळ तिथं सामान घेऊन थांबायचं. बस आली की जायचं. एक छप्पर, आडोशासाठी भिंत, येवढं पुरेसं असतं, करायचीय काय त्यासाठी एकादी वास्तू.   १९९० पूर्वीच्या सोवियेत युनियनची गोष्टच वेगळी आहे. तिथं बस स्टॉप म्हणजे एक कलात्मक वास्तू होती. विचारपूर्वक, मेहनतीनं केलेलं बांधकाम. एकाद्या गावात नव्हे तर गावोगाव. सोवियेत युनियनच्या पंधरा राज्यांत असे  किती तरी कलात्मक…

Read More Read More