गाझाची खरेदी रियल एस्टेटवाले ट्रंप करणार
एका नव्या उत्पाताचं सूतोवाच अमेरिकेचे प्रेसिडेंट डोनल्ड ट्रंप यांनी केलं आहे. ट्रंप यांना गाझाची मालकी हवीय. ती मिळवण्यासाठी प्रसंगी ते अमेरिकेचं सैन्यही गाझात पाठवायला तयार आहेत. आज घडीला ते फक्त बोललेत, त्यांनी आपला विचार अमलात आणायचा प्रयत्न केला तर मध्य पूर्वेत काय होईल? सारं जग उलथापालथीत सापडेल? ट्रंप पहिल्या खेपेला प्रेसिडेंट झाले होते तेव्हां म्हणाले होते की इराकमधे आणि अफगाणिस्तानमधे सैन्य घुसवणं ही अमेरिकेची चूक होती, आपण तो उद्योग पुन्हा करणार नाही. आता दुसऱ्या खेपेत ट्रंप गाझढा या दुसऱ्या एका…