ट्रंप बायडन चर्चा, धड करमणूकही नाही, धड ज्ञानही नाही.
डोनल्ड ट्रंप आणि जो बायडन यांच्यात झालेल्या टीव्ही चर्चेमुळं अमेरिकेच्या भवितव्याबद्दल शंका आणि निराशाच पदरी पडली. दोघेही सत्तरी पार केलेले, एक गडी प्रेसिडेंट, एक गडी आठ वर्ष व्हाईस प्रेसिडेंट. दोघे करोडो लोकांच्यासमोर भांडतांना दिसतात हे काही देशाच्या चांगल्या भवितव्याचं लक्षण नव्हे. अमेरिकेसमोरचे पाच मुख्य प्रश्न घेऊन त्यावर दोघांनी दीड तास बोलावं अशी योजना होती. अर्थव्यवस्था, शांतता, पर्यावरण, कोविड वंशवाद अशा प्रश्नावर दोघांनी प्रथम दोन दोन मिनिटात बाजू मांडावी आणि नंतर उरलेल्या वेळात चर्चा करावी अशी योजना होती. ट्रंप सतत खोटं…