स्वातंत्र्याची विरूप व्याख्या
रशियामधे, मॉस्कोमधे, साठेक हजार नागरिकांनी निदर्शनं केली. पोलिसांना त्यांना बदडलं. सुमारे १५०० निदर्शकांना तुरुंगात डांबलं. मॉस्कोमधे आणि रशियात निदर्शनं करायची असतील, मोर्चे काढायचे असतील तर सरकारची परवानगी घ्यावी लागते, मंजुरी घ्यावी लागते. वरील निदर्शनांना मंजुरी नव्हती असं रशियन सरकारचं म्हणणं आहे. मॉस्कोमधे झालेली निदर्शनं ही एकटीदुकटी घटना नव्हती. रशियात आणखी डझनभर ठिकाणी तरी नागरिकांनी आपला असंतोष व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आणि सरकारनं तो दडपला. मॉस्कोमधल्या निदर्शकांची मागणी होती की होऊ घातलेल्या मॉस्को पालिकेच्या / विधानसभेच्या निवडणुकीत स्वतंत्र उमेदवारांना उभं रहाण्याची…