Browsed by
Category: लेख

गांधी आणि मोदींच्या गरीबी निर्मूलन योजना

गांधी आणि मोदींच्या गरीबी निर्मूलन योजना

नरेंद्र मोदीनी किसान सम्मान योजनेतहत शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये देण्याची घोषणा केली. गरीब शेतकऱ्याला हे पैसे दिले जातील. शेतकऱ्याला इतर वाटांनी अनुदानं किंवा मदत दिली जात असेल तर ती थांबेल काय? की इतर कुठल्याही प्रकारची मदत मिळत असली तरी स्वतंत्रपणे हे सहा हजार म्हणजे महिना पाचशे रुपये मिळतील?  शेतकऱ्याची दुर्दशा आहे कारण त्याच्याजवळ अगदी कमी जमीन आहे आणि ती जमिन कसून त्याचं पोट भरत नाही. सिंचन, वीज, बीबियाणं, खतं, जंतुनाशकं, कर्ज आणि शेतमालाला हमी भाव या बाबत सरकारनं अनुदानं,…

Read More Read More

नंदनवन, पुन्हा एकदा.

नंदनवन, पुन्हा एकदा.

UTOPIA FOR REALISTS RUTGER BREGMAN Pub: De Correspondent ।। आपल्या खिशात नसलेले पैसे खर्च करून आपल्याला आवश्यक नसलेल्या वस्तू खरीदायच्या; आपण ज्यांना सहन करू शकत नाही अशा माणसांवर इंप्रेशन मारण्यासाठी. नंतर आपलं मानसीक स्वास्थ्य बिघडलंय असं म्हणत मानसोपचारकाच्या खांद्यावर मान ठेवून रडायचं. ही आहे आजची संस्कृती, या अनावस्थेत आपण जगतोय. रटजर ब्रेगमन या नव्या दमाच्या अर्थविचाराच्या इतिहासाच्या अभ्यासकानं वरील वाक्यात आजचा काळ रंगवलाय आणि या दुरवस्थेबाहेर पडण्यासाठी एक नवी वाट सुचवलीय.  अर्थविचारात दोन तट आहेत. बाजारवादी आणि मार्क्सवादी. दोघांनाही समाजात…

Read More Read More

आपलं महानपण मिरवत रहाणं हे परदेश नीतीचं सूत्र असता नये

आपलं महानपण मिरवत रहाणं हे परदेश नीतीचं सूत्र असता नये

मसूद अझरला दहशतवादी जाहीर करा हा  युनायटेड नेशन्सच्या सुरक्षा परिषदेतला ठराव चीननं आपला नकाराधिकार वापरून नाकारला. या घटनेवर राहूल गांधी म्हणाले की नरेंद्र मोदी चीनच्या सी जिनपिंगना घाबरतात, त्यांच्या विरोधात बोलायला  तयार होत नाहीत, नरेंद्र मोदींचं परदेश धोरण अपयशी ठरलं आहे. राहूल गांधी विरोधी पक्षाचे नेते आहेत. त्यांनी सत्ताधारी नरेंद्र मोदींवर टीका करणं समजण्यासारखं आहे. सत्ताधाऱ्यांना आणि सत्ता समर्थकांना नरेंद्र मोदींचं धोरण यशस्वी वाटणार हेही समजण्यासारखं आहे. पण नरेंद्र मोदीचं राहूल गांधीना दिलेलं उत्तर पोरकट आहे येवढंच नाही तर धादांत…

Read More Read More

इचलकरंजीतलं वाचनालय, वय वर्षे १४९.

इचलकरंजीतलं वाचनालय, वय वर्षे १४९.

इचलकरंजीतल्या आपटे वाचन मंदिराच्या एका छोट्याशा खोलीत चित्कला कुलकर्णी भेटल्या. एका झोळीवजा पिशवीतली पुस्तकं त्यांनी पुस्तकालयात काम करणाऱ्या बाईंसमोर ठेवली.काही पुस्तकं परत करायची होती, काही वाचण्यासाठी घरी न्यायची होती.   इचलकरंजी या कापड उद्योगी रखरखीत गावात एकाद्या पुस्तकालयात पुस्तकांत गुंतलेली एकादी व्यक्ती पहाणं उत्सूकता चाळवणारं होतं. कुलकर्णी स्थानिक शाळेतल्या शिक्षिका. पाठ्यपुस्तकाच्या पलिकडं जाऊन मुलांशी ज्ञान शेअर करता यावं यासाठी त्या एकेक विषय घेऊन खोलात जाऊन अभ्यास करत. तशा अभ्यासाचा नादच त्याना लागला. शाळेतली नोकरी लवकर सोडून देऊन त्या पूर्णवेळ अभ्यास आणि…

Read More Read More

पुलवामानंतर….

पुलवामानंतर….

पुलवामामधे जैशे महंमदच्या हस्तकानं सीआरपीएफच्या ४३ जवानांना ठार मारलं. नंतर भारतीय विमानांनी पाकिस्तानात खोलवर जाऊन  जैशे महंमदच्या केंद्रावर हल्ला केला. नंतर पाकिस्तानी विमानानी भारतीय हद्दीत हल्ला केला.  पाकिस्तानवर हल्ले करून त्या देशाचं जास्तीत जास्त नुकसान केलं पाहिजे अशी भावना भारतीय जनतेमधे  फैलावली आहे. भाजप म्हणत आहे की पाकिस्तानला धडा शिकवण्याचं सामर्थ्य आणि इच्छाशक्ती केवळ त्यांच्याकडंच आहे, बाकीचे पक्ष कुचकामी आहेत, येत्या निवडणुकीत भाजपलाच निवडून द्या असा उघड प्रचार भाजप करत आहे. विरोधी पक्ष म्हणतात की पाकिस्तानवर कारवाई जरूर केली पाहिजे…

Read More Read More

काश्मीरवर बहिष्कार? असं नका करू.

काश्मीरवर बहिष्कार? असं नका करू.

सैन्यातल्या एका निवृत्त कर्नलनं म्हणे एक वक्तव्य केलं. ”  काश्मिरमधे जाऊ नका. अमरनाथ यात्रेला जाऊ नका. काश्मिरी लोकांकडून वस्तू खरेदी करू नका. काश्मिरी व्यापाऱ्याशी व्यवहार करू नका. काश्मिरी लोकांवर बहिष्कार घाला. “ पुलवामामधे  जैशे महंमद या पाकिस्तानी सैन्यानं पुरस्कृत केलेल्या अतिरेक्यानं ४३ भारतीय सैनिक मारल्यानंतर देशभर उसळलेल्या संताप आणि दुःखाच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य झालंय. या वक्तव्याचा गंभीर परिणाम भारत देशाच्या शांतता व स्थैर्यावर होऊ शकतो. कोण आहेत हे कर्नल? शोधून काढणं कठीण नाही. मेघालयाचे राज्यपाल तथागत रॉय यांनी कर्नलच्या वक्तव्याला…

Read More Read More

भ्रष्टाचार आहे की नाही ते माहित नाही पण गैरव्यवहार आणि घातक व्यवहार मात्र नक्कीच आहे.

भ्रष्टाचार आहे की नाही ते माहित नाही पण गैरव्यवहार आणि घातक व्यवहार मात्र नक्कीच आहे.

  राफेल विमानांच्या किमती वाढल्या.करारानुसार  वाढीव रक्कम दसॉ आणि रिलायन्स या कंपन्यांना वाटून मिळाली. ।। १३ मार्च २०१४ रोजी राफेल विमानांच्या बाबतीत दसॉ ही फ्रेंच कंपनी आणि हिंदुस्थान एरोनॉटिक्स (हिंए) ही भारत सरकारची कंपनी यांच्यात करार झाला. त्यानुसार भारतासाठी दसॉ १०८ लढाऊ विमानं तयार करणार होती. प्रत्येक विमानाची अदमासे किमत ६७० कोटी रुपये होती. ७० टक्के निर्मिती हिंए आणि ३० टक्के निर्मिती दसॉ करणार होती. २७ मे २०१४ रोजी एनडीएचं सरकार स्थापन झालं. नरेंद्र मोदी पंतप्रधान आणि अरूण जेटली संरक्षण…

Read More Read More

नागरीक कायदा सुधारणा. निर्रथक, घातक, राजकीय खेळी.

नागरीक कायदा सुधारणा. निर्रथक, घातक, राजकीय खेळी.

नागरीकत्व कायदा सुधारणा, राजकीय खेळी. भारत सरकारचं नागरीकत्व कायद्यातल्या सुधारणांचं विधेयक उत्तर पूर्व भारतात खळबळ माजवून राहिलं आहे. नागरीकांनी या विधेयकाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विधेयक मांडणाऱ्या सत्ताधारी भाजपतल्या लोकांनी, आमदारांनीही हे विधेयक नाकारलं आहे. हे विधेयक १९५५ च्या नागरीकत्व कायद्यात सुधारणा सुचवतंय. १९५५ च्या कायद्यानुसार बाहेरून भारतात आलेल्या माणसांकडं योग्य प्रवासी कागदपत्रं नसतील किंवा  भारतात आल्यानंतर परवानगी दिलेला काळ ओलांडून अधिक काळ माणूस भारतात राहिला असेल तर त्याला बेकायदेशीर स्थलांतरीत मानलं जातं, हाकललं जातं. बाहेरून येणारी काही माणसं …

Read More Read More

आता जॉर्जही नाहीत….

आता जॉर्जही नाहीत….

 २०४ चर्नी रोड.  १९६७ ची स.का.पाटील यांना हरवणारी ऐतिहासिक निवडणुक जॉर्जनी इथून लढवली. या इमारतीत हिंदू मजदूर पंचायत, बाँबे लेबर युनियन, म्युनिसिपल मझदूर युनियन इत्यादी अनेक कामगार संघटनांच्या कचेऱ्या असत. संयुक्त समाजवादी पक्षाचंही कार्यालय इथंच होतं.  जॉर्ज फर्नांडिस इथंच बसत. याच इमारतीत जॉर्ज यांची कामगार चळवळ कारकीर्द  आकाराला आली. असं सांगतात की जॉर्ज मुंबईत प्रथम आले तेव्हां गोदीबाहेरच्या फूटपाथवर रहात आणि या कचेरीत येत. नंतर यथावकाश ते हाकेच्या अंतरावर ह्यूजेस रोडवरच्या पानगल्लीतल्या एका छोट्या घरात रहायला गेले.  इमारतीच्या तळ मजल्यात एक बँक…

Read More Read More

संमेलनाची गर्दी आणि वाचनाची परवड

संमेलनाची गर्दी आणि वाचनाची परवड

साहित्य संमेलन सुरु असतानाच वर्तमानपत्रातून एक माहिती प्रसिद्ध झाली.  मुंबई, पुणे व इतर शहरांतली एकूण पुस्तक दुकानं आणि त्यातल्या त्यात मराठी पुस्तकं विकणारी दुकानं बंद होत चाललीयत.  काही दिवसांपूर्वी मुंबईतलं स्ट्रँड बुक स्टॉल बंद झालं त्या वेळी बरीच माणसं हळहळली. फोर्ट विभागात काम करणारी माणसं जेवणाच्या सुट्टीत या दुकानात जात असत. काही माणसं ऑफिस सुटल्यावर तिथं रेंगाळत. फोर्ट विभागात काम नसणारी दूरवर रहाणारी, उपनगरातली माणसं मुद्दाम आठवड्यातून एकदा या दुकानात जात असत. नाना प्रकारची पुस्तकं तिथं मिळत. दुकानातली माणसं कुठल्या…

Read More Read More