साधूंच्या हातात राज्य
नामदेव दास त्यागी हा माणूस त्याच्या ड्रेसवरून साधू आहे असं दिसतं. कपाळावर भस्माचे पट्टे असतात. जटा आहेत. न शिवलेलं वस्त्र गुंडाळतात. गळ्यात रुद्राक्षाच्या आणि कसल्या कसल्या तरी मण्यांच्या माळा असतात. त्यांच्याकडं एक लॅपटॉप नेहमी असतो. लोक त्यांना कंप्यूटर बाबा म्हणतात. त्यांच्याकडं एक हेलीकॉप्टरही आहे. कंप्यूटर बाबांना मध्य प्रदेशच्या लोकांची सेवा करायची आहे, पारमार्थिक किंवा अद्यात्मिक नव्हे, ऐहिक सेवा. २०१४ साली त्यांनी सेवा करता यावी म्हणून केजरीवाल यांच्याकडं आम आदमी पार्टीचं तिकीट मागितलं. मिळालं नाही. त्यांनी भाजपशी जुळवून घ्यायचा प्रयत्न…