शब्दांच्या आधीची भाषा शोधणारा कलाकार, जॉन बर्जर.
विराटनं तळव्याच्या आकाराचं एक पुस्तक काढून मला दिलं. म्हणाला ” आताच आलय. लेखक आताच वारला, जुन्या पिढीचा लेखक आहे. तुम्ही कधीतरी वाचला असेल. पहा. छान आहे.” जॉन बर्जरचं पुस्तक होतं, शीर्षक होतं कॉनफॅब्युलेशन्स. छोटं पुस्तक. जाड टायपायतलं. पानं १५० पण मजकूर अगदीच कमी. पानावर ऐसपैस जागा सोडलेली. पुस्तकात खचाखच मजकूर भरून कमीत कमी पानात जास्तीत जास्त मजकूर घुसवून पुस्तक स्वस्त करणं अशी एक रूढी प्रकाशन विश्वात तयार झालीय. अशोक शहाणे वगैरे माणसांनी ही रूढी नाकारली. पुस्तकात आसपास जागा सोडणं, दोन…