लिलिबिट या मुलीची राणी एलिझाबेथ होते
एक मुलगी. साध्याशा फ्रॉकमधे खेळतांना, हिंडताना दिसते. ती जिथं वावरते ते घर आणि परिसर हे एक मोठं प्रकरण आहे हे सहज लक्षात येतं. हळूहळू कळतं की तो बकिंगहॅम राजवाडा आहे. ही मुलगी कोण? ही मुलगी एका मोठ्या माणसाला म्हणजे तिच्या वडिलांना म्हणजे राजे जॉर्ज यांना शपथ देते. हा काय प्रकार? खूप वेळानं कळतं की जॉर्जचा मोठा भाऊ एडवर्ड हा खरा राजा असतो. पण त्याला एका घटस्फोटितेशी लग्न करायला राजवाडा परवानगी देत नसल्यानं त्याला सिंहासन सोडावं लागतं. मनापासून तयार नसतांनाही जॉर्जला…