Browsed by
Category: लेख

भारतातलं राजकारण पाकिस्तानच्या दिशेनं?

भारतातलं राजकारण पाकिस्तानच्या दिशेनं?

गणपती गेले. आता देव्या येतील. गणपती आले होते तेव्हां प्रत्येक गणपती मंडळाच्या बाहेर राजकीय पक्षांचे फलक होते. गणेश भक्तांचं स्वागत करणारे. बहुतेक फलकांवर त्या त्या पक्षाच्या गल्लीनिहाय पुढाऱ्यांचे फोटो होते. गणपतीचं विसर्जन झालं तेव्हां गणपतींना निरोप देणारे फलक लागले. नवरात्रात असे किती फलक लागतात ते पहावं लागेल. कारण नवरात्र असेल तेव्हां महाराष्ट्रात निवडणुका असल्यानं आचार संहिता असेल. फलकांवर झालेला खर्च उमेदवाराच्या खर्चात सामिल होईल. गणपती उत्सव सुरू झाला तोच मुळी राजकीय कारणांसाठी. टिळकाना जनजागृती करायची होती. स्वातंत्र्यासाठी. टिळकांच्या काळात उत्सवाचा…

Read More Read More

इस्लामी स्टेट नष्ट करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न

इस्लामी स्टेट नष्ट करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न

इस्लामी स्टेट या संघटनेचा नायनाट करायचं अमेरिकेनं ठरवलंय. ते योग्य दिसतय. आज घडीला इस्लामी स्टेट या दहशतवादी क्रूर संघटनेला पायबंद घालण्याचा दुसरा मार्ग दिसत नाहीये. इस्लामिक स्टेट – इस्लामी राज्य (इरा)  ही संघटना खलास करण्यासाठी अमेरिकेनं जगातल्या पंधराएक देशांचं एक गाठोडं  बांधलं  आहे. इराचा धोका या कापडात पंधरावीस वस्तू  बांधण्यात आल्या आहेत.  अमेरिका आपलं सैन्य इराक-सिरियात उतरवणार नाही. ड्रोन प्रणाली, शस्त्रं आणि पैसा या तीन वाटांनी अमेरिका इराविरोधी कारवाईत भाग घेईल. इतर देशांनी पैसे आणि सैनिक या मोहिमेत गुंतवावेत अशी…

Read More Read More

आमदार म्हणजे मतांचे कंत्राटदार

आमदार म्हणजे मतांचे कंत्राटदार

गाबीत, पाचपुते इत्यादी मंडळी भाजपत दाखल झाली. सर्वांवर भ्रष्टाचाराचे, बेकायदेशीर वर्तनाचे आरोप. त्या आधी मेटे दाखल झाले. त्यांच्यावर दंगल केल्याचे आरोप. एका पक्षातील लोक दुसऱ्या पक्षात जाणं ही गोष्ट राजकारणात नेहमी घडत असते. आधीच्या पक्षात अडचण झालेली असते आणि नव्या पक्षांना अडचणीतून वाट काढायची असते. तेव्हां दोन्ही बाजूंनी अडचणींचा मामला. अडला हरी गाढवाचे पाय धरी अशी एक म्हण आहे. हरीलाही गाढवाचे पाय धरावे लागतात तर मातीचे पाय असणाऱ्या राजकीय पक्षांच्या बाबतीत आक्षेप कसा घेणार.   महाराष्ट्रात भाजपला बाहेरून माणसं आयात…

Read More Read More

फॉयल

फॉयल

दुकानं बंद, नेटवर पुस्तकांची खरेदी अमेरिकेत फिरणाऱ्या माणसाचा एक सुखद अनुभव म्हणजे बार्नस अँड नोबल पुस्तकाच्या दुकानात फेरी मारणं. न्यू यॉर्क, शिकागो, कोलंबस,कुठंही ही दुकानं असतात. तीन चार मजल्यांची. हज्जारो चौरसफुटांची जागा आणि त्यात किती तरी म्हणजे किती तरी पुस्तकं. निवांतीनं पुस्तकं चाळत,वाचत बसायचं. सोबतीला कॉफी, केक्स, ब्राऊनी वगैरे. साहित्य, चित्रपट, नाटक, चित्रकला,विज्ञान, तंत्रज्ञान,बाल साहित्य, लिबरल आर्टस असे आणि किती तरी विषय. झटकन वाचता येणाऱ्यापासून ते पीएचडी वगैरेत गुंतलेल्यांना उपयोगी पडावीत अशी पुस्तकं.   असं हे बार्नस अँड नोबल आता…

Read More Read More

सेटलॉफ

सेटलॉफ

सेटलॉफ हा आयसिसनं शिरच्छेद केलेला दुसरा पत्रकार. हाणामाऱ्या चाललेल्या ठिकाणी जाऊऩ पत्रकारी करण्याचा बराच अनुभव त्याच्या गाठीशी. सीरियात यादवी सुरू झाल्यापासून तो तिथं होता.त्या आधी तो लिबियात होता, इजिप्तमधे होता आणि अल कायदाचा पक्का अड्डा असलेल्या येमेनमधे होता. पर्वतांवर जाणारी माणसांना बर्फाची, विरळ हवामानाची सवय असते, वादळं आणि लहरी हवामानाची सवय असते. सर्व नैसर्गिक संकटांना तोंड देण्याची सामग्री घेऊन आणि मुख्य म्हणजे वाटाडे घेऊन ते पर्वतात पोचतात. सेटलॉफ हा अशाच संकटांत शिरणाऱ्यांपैकी एक. 1 ऑगस्ट 2013 रोजी तो सीरिया-तुर्कस्तानच्या सीमेपासून…

Read More Read More

फॉयल

फॉयल

जेम्स फॉयल या अमेरिकन छायापत्रकाराचा शिरच्छेद आयसिस या दहशतवादी संघटनेच्या माणसानं  इराकमधे केला. जेम्स फॉयल २०१२ पासून सीरियात होता. त्याचं अपहरण करण्यात आलं होतं.   कोणी म्हणतं की असदच्या लोकांनी त्याला पकडलं होतं, कोणी म्हणतं की आयसिसनं पकडलं होतं. अमेरिकेनं जंग जंग पछाडलं पण त्याचा पत्ताही लागू शकला नव्हता. अचानक   त्याच्या शिरच्छेदाची व्हिडियो क्लिप दाखवण्यात आली तेव्हां त्याचा पत्ता लागला. ब्रिटीश घाटणीचं बोलणाऱ्यानं शिरच्छेद केला होता. अमेरिकेनं इराकमधे आयसिसवर हवाई हल्ले केल्याचा निषेध आणि इशारा म्हणून हा उद्योग आयसिसनं…

Read More Read More

कोकण रेलवेनं दगा दिल्यावर प्रवाशांची तारांबळ उडाली. कित्येक तासांची रखडपट्टी, पुन्हा गाडी केव्हां सुटेल आणि केव्हां पोचेल याची खात्री नाही. घरून सामान बोचकी घेऊन निघालेले. सोबत पोरंबाळं. इतर काही वाहन मिळवण्याची जीवघेणी खटपट. त्याचा फायदा बसवाल्यांनी घेतला. तीन चारशे रुपयांच्या जागी पंधराशे रुपये बसवाल्यानी घेतले. मुंबई गोवा बसेसमधे चार हजार रुपये घेण्यात आले मग तुम्ही कणकवलीला उतरा नाही तर कुडाळला. हे वागणं क्रिमिनल आहे. कोणत्या कायद्याखाली त्यांच्यावर कारवाई होऊ शकते? मागणी आणि पुरवठा या आर्थिक न्यायाला अनुसरून तिकीटाच्या किमती वाढवण्यात…

Read More Read More

कर्नाटकातल्या भटकळ गावात जन्मलेला सुलतान अब्दुल कादिर आरमार गेले काही दिवस अन्सार उल तौहिद या वेबसाईटवर दिसत होता.( अब्दुल कादीरचं शिक्षण लखनऊच्या दारुल उलूम या धर्मीशाळेत झालेल आहे.) वेबसाईटवरून त्यानं भारतातल्या मुसलमान तरुणाना आवाहन करून जिहादमधे भाग घ्यायला बोलावलं. अफगाणिस्तानात या, तिथं प्रशिक्षण घ्या आणि सीरियातल्या जिहादमधे भाग घ्या असं त्यानं सांगितलं. सीरियातलं असद यांचं सरकार धर्मभ्रष्ट असल्यानं त्या िवरोधात लढणाऱ्या ISIS या जिहादी संघटनेत या असंही तो म्हणाला. त्या बरोबरच भारतातले गाईची पूजा करणारे, ब्राह्मण, इस्लामी नसलेले, अश्रद्ध इत्यादींचाही…

Read More Read More

vying for allah vote

vying for allah vote

एक पुस्तक नुकतंच वाचलं. vying for alla’s vote. पाकिस्तानच्या राजकारणाचा अभ्यास करणारं.  जिथं धार्मिक माणसं जास्त असतात तिथले राजकीय पक्ष धर्माचा वापर, धार्मिक मूल्यं आणि प्रतिकं यांचा वापर मतं मिळवण्यासाठी करतात. ते आजवरचा इतिहास पहाता अटळ दिसतं. परंतू असा वापर अतिरेकी-दहशतवादी संघटनांना जन्म आणि अन्नपाणी देऊ शकतो हे पाकिस्तानात सिद्ध होत आहे. पाकिस्तान आज एका विभाजक रेषेवर उभा आहे. दहशतवादी विचार आणि संघटना देशाचा आणि समाजाचा ताबा घेऊन लोकशाही-मोकळेपणा संपवू शकतात. किंवा लोकशाही आणि आर्थिक गरजा यांचा परिणाम म्हणून अतिरेकी…

Read More Read More

नटवरसिंग

नटवरसिंग

आत्मकथनांमधून सार्वजनिक संस्थांची प्रकृती समजायला मदत होते. नटवर सिंग यांचं one life is not enough हे आत्मकथन प्रसिद्ध झालंय. नटवरसिंग पूर्वी परदेश मंत्री होते. इराकबरोबर तेलाच्या बदल्यात अन्न व्यवहार प्रकरणात त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यांना मंत्रीपद सोडावं लागलं. नंतर ते पक्षाच्याही बाहेर पडले. गेली काही वर्षं ते राजकीय विजनवासात आहेत. आत्मकथन  प्रसिद्ध होणार असं कळल्यावर सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी नटवरसिगांना जाऊन भेटल्या आणि प्रसिद्ध करू नका अशी विनंती केली असं म्हणतात. त्यांना सुगावा लागला होता की त्यांचे उल्लेख कथनात…

Read More Read More