वसुंधरा राजे, सुषमा स्वराज, छगन भुजबळ.
ललित मोदी प्रकरण थंडावलंय. माध्यमांच्या खोदकामातून आता नवं काही बाहेर निघत नाहीये. प्रकरण असं. ललित मोदी नावाचा एक माणूस. समाजातल्या तालेवार घराण्यांशी संबंध असलेल्या घराण्यात जन्मला. वसुंधरा राजे या राजघराण्याशी मोदी घराण्याचे कौटुंबिक संबंध. त्यामुळं मोदी राजे घराण्यातल्या वातावरणात, त्या निमित्तानं राजस्थान सरकारात लीलया वावरत असे, घरचं असल्यागत. खेळा भोवती त्यानं आपलं जाळं गुंफलं. राजस्थान क्रिकेटचा वापर करून तो देशातल्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे घुसला. मॅचेस खेळवणं, स्टेडियम इत्यादी व्यवस्था ताब्यात घेऊन त्यांचा वापर करणं यामधे त्यानं करियर केलं. सुरवातीला राजस्थानात,…