मोदी, ओबामा, पर्सनल केमेस्ट्री
नरेंद्र मोदींनी बराक ओबामांना मिठ्या मारल्या. ओबामांसोबत जाहीर बोलताना मोदी ओबामांचा उल्लेख बराक बराक असा करत होते. ओबामांशी आपली जवळीक आहे आपण ओबामा यांच्यात एक पर्सनल केमेस्ट्री आहे असं मोदी दाखवत होते. देशाचे प्रमुख म्हणून कामासाठी, करार करण्यासाठी, प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रपती-पंतप्रधान ही माणसं एकत्र येतात तेव्हांही ती देशप्रमुख असली तरी मुळात माणसंच असतात. या माणसांचं आपसात किती जुळतं, भेटीमधे त्यांच्यात किती आपुलकी निर्माण होते, माणसं म्हणून ती एकमेकाच्या किती जवळ येतात याला महत्व असतं. शिखरावरच्या एकट्या पडलेल्या माणसांचं आपसातलं सूत…