अली खामेनींचा खून होणार?
(टीप. इस्रायल-इराण युद्धातली स्थिती दर काही तासांनी बदलत आहे. मजकुरावरची शाई वाळते न वाळते तोवर स्थिती बदललेली असते.) (दि. १८ जून) इस्रायलनं इराणमधल्या सेंट्रीफ्यूज इमारतीवर हल्ला केला. सेंट्रीफ्यूज जमिनीखाली खोलवर होतं. खूप शक्तीशाली बाँब इस्रायलनं वापरला. इराणनं तेल अवीव, हैफा आणि जेरुसलेमवर रॉकेटं सोडली, अनेक इमारती उध्वस्थ केल्या. विमानं, क्षेपणास्त्रं, दोन्ही देशात खोलवर पोचलीत. याचा अर्थ विमानं,क्षेपणास्त्रं इत्यादी वाटेतच अडवणं, वाटेतच ती नष्ट करणं या दोन्ही गोष्टी दोन्ही देशाना पुरेशा जमत नाहीयेत. याचाच अर्थ इस्रायल इराण युद्धात खूप हानी होतेय,…