गडगडाट. पाऊस पडला नाही. ट्रंप पुतीन चर्चा.
गडगडाट झाला. विजा चमकल्या. पाऊस पडला नाही. युक्रेन-रशिया युद्ध थांबलं नाही. डोनल्ड ट्रंप व्लादिमिर पुतीन यानी ढोल बडवून गवगवा करून चर्चा केली. युद्ध सुरूच राहिलं. अलास्का या अमेरिकेतल्या राज्यात बैठक झाली. हे राज्य १८७८ साली रशियन राणीनं अमेरिकेला विकलं होतं.रशिया एका युद्धात पार बुडाला होता, रशियाकडं पैसे नव्हते. अलास्का विकून रशिया तगला होता. आठवडाभर ट्रंप संदेश देत होते. निघतांना व्हाईट हाऊसच्या विमानतळावर त्यांनी संदेश दिला. विमानात बसून संदेश दिला. विमान अलास्कात उतरल्यावर ट्रंप विमानाबाहेर आले आणि सदेश दिला. ‘मी युक्रेन-रशिया…