ट्रंप यांचा नवा गाझा प्लॅन
गाझा युद्ध थांबवण्यासाठी ट्रंप यांनी नवी पुडी सोडली आहे. ट्रंपनी जे मांडलंय त्याला प्लॅन असं म्हटलं जातं. पण असे अनंत प्लॅन ट्रंपनी मांडलेत आणि ते सारे फेल गेलेले आहेत, त्या वल्गना ठरल्या आहेत.ट्रंप यांचे प्लॅन विचारपूर्वक तयार झालेले नसतात, ते त्यांची लहर असतात. नवा प्लॅन २१ कलमी आहे. गाझातले ओलिस आणि मृतांची शवं हमासनं इस्रायलला सोपवावीत; इस्रायलनं गाझी कैदी हमासला परत करावेत; हमासनं शस्त्र टाकावीत आणि गाझातून निघून जावं; एका अंतरीम बोर्डानं गाझाचा कारभार हाती घ्यावा (त्या अंतरीम बोर्डाचे प्रमुख…