मराठवाड्यात ७ दिवसांत ३४ शेतकरी आत्महत्या कां करतात?
मराठवाड्यात ११ ते १७ ऑगस्ट या ७ दिवसांत ३४ शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्यांची नोंद झाली आहे. महाराष्ट्र सरकार आपण शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामांचे आणि योजनांचे ढोल बडवत आहे. जलयुक्त शिवार काय, पीक विमा योजना काय, कर्जमुक्ती काय आणि कायन् काय. २०१४ साली भाजप आणि सेनेनं आधीच्या काँग्रेसनं महाराष्ट्र कुठं नेला होता त्याचा शोध घेऊन महाराष्ट्र पुन्हा वळणावर आणण्यासाठी सरकार स्थापन केलं. त्यालाही आता तीन वर्षं झालीत. भाजपनं महाराष्ट्र कुठे नेलाय असं म्हणायची संधी काँग्रेसला मिळाली नव्हती कारण त्यांना स्वातंत्र्यानंतर सत्ता उपभोगण्याचा कायमचा…