चुका कबूल करणारा बियॉन बोर्ग
चुका कबूल करणारा बियॉन बोर्ग बियॉन बोर्गचं ‘हार्टबिट्स’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध झालंय. बियॅान बोर्ग आठवतोय? टेनिस पर्वताचं एव्हरेस्ट शिखर. ओळीनं सहा वेळा विंबल्डन जिंकला. ओळीनं सहा वेळा फ्रेंच ओपन जिंकला. जगातले सर्व चषक जिंकले. करियरच्या टॅापला असतांना वयाच्या २५ व्या वर्षी, १९८१ साली, बोर्गनं टेनिस सोडलं. सोडलं म्हणजे सोडलंच. कंटाळला होता. घराच्या किंवा हॉटेलच्या बाहेर पडला की पत्रकार, फोटोग्राफरचा गराडा पडे. सतत पाच पन्नास वह्या सहीसाठी समोर असत. जणू जगाच्या गॅलरीत ठेवलेलं पेंटिंग. पेंटिंगला कधी खाजगी आयुष्य नसतं. कायम…