नेपाळ पाठोपाठ भारत?
आपल्या शेजारच्या नेपाळी तरुणांनी केलेल्या आंदोलनामुळं नेपाळमधलं सरकार पडलं, पंतप्रधान ओली देश सोडून पळून गेलेत. ओली हा पळून गेलेला तिसरा शेजारी पळपुटा. २०२२ मधे लंकेचे गोटाबाया पळाले. भ्रष्ट होते. पोरांनी त्यांना पळवून लावलं. नंतर २०२४ साली बांगला देशच्या हसीना पळाल्या, त्याही भ्रष्ट आणि त्यांनाही पोरांनी पळवून लावलं. नेपाळी तरूणांना सरकारवर राग होता. सरकार आणि तमाम पुढारी भ्रष्ट आहेत; आम्ही कठीण परिस्थितीचा सामना करत असताना पुढाऱ्यांची मुलं ऐश करतात; यांना सरकार चालवता येत नाहीये असं तरुणांचं म्हणणं होतं. तरूणांचा हा राग…