लकी भास्कर
‘लकी भास्कर’ ही तेलुगू फिल्म नेटफ्लिक्सवर आलीय. ट्रेलरमधे लिहिलं होतं की ही फिल्म थ्रिलर आहे.बँक क्लार्कच्या श्रीमंत होण्याचं धाडस चित्रपटात आहे असंही लिहिलं होतं. हीरोचे धोनीसारखे भरघोस केस, चेहऱ्यावर एक प्रसन्न हास्य. देखणा नाही पण आवडू शकेल असा माणूस. बँकेत काम करतो. मग त्यात थ्रिल कशा प्रकारचं असेल असा विचार मनात आला.भाग्यवान आणि थरार. उत्सूकता जागृत झाली. एका साधा घरेलू माणूस, घर चालवण्यासाठी त्याला एक्स्ट्रा पैसे मिळवायचे असतात. बँकेचे पैसे तो वापरतो. बँकेचे पैसे घ्यायचे, स्मलगर लोकांना द्यायचे, वेळेवर पुन्हा…