नेतान्याहू की हिटलर?
नव्वद दिवसांच्या नाकेबंदीनंतर गुरुवारी सकाळी सुमारे ९० ट्रक गाझामधे शिरले. या ट्रकमधे औषधं नाहीत, फक्त धान्य आहे. गाझातल्या बेकऱ्या त्या धान्याचं पीठ करायची वाट पहात आहेत. हे धान्य सुमारे १४ हजार उपासमार झालेल्या मुलांसाठी आहे. वरील ट्रकमधे औषधं नाहीत. उपासमारीमुळं मुलांना जंतुसंसर्ग झालाय, अनेक मुलांचं डिहायड्रेशन झालंय. त्यांच्यासाठी औषधं आणि सलाईन इत्यादी पाठवावं अशी विनंती करण्यात आली होती. नेतान्याहू यांनी औषधं पाठवायला नकार दिलाय. युद्धतहकुबीच्या ६ आठवड्याच्या काळात काही अन्न गाझात पोचलं होतं.तेवढ्यावर आतापर्यंत वृद्धांनी तग धरली होती. आता लाखभर…