दारू. डेंजर. पिणं कमी होईल?
इथून पुढं कधीही दारूच्या बाटलीवर कवटी हाडाचं चिन्हं दिसू शकेल. ज्या कुठल्या बाटलीत अल्कोहोलवालं पेय असेल अशा प्रत्येक बाटलीवर. त्या चिन्हाखाली लिहिलेलं असेल ‘दारू आरोग्याला हानीकारक ठरू शकते. दारूमुळं सतरा प्रकारचे कॅन्सर संभवतात. दारु पिण्यापूर्वी विचार करावा.’ वरील सूचना सर्जन जनरलनं अमेरिकन काँग्रेससमोर ठेवली आहे; अमेरिकन काँग्रेसनं कायदा करावा असा त्या सूचनेमागचा उद्देश आहे. सर्जन जनरल हे अमेरिकेच्या आरोग्याची काळजी घेणारं एक पद आहे. हज्जारो संशोधकांनी केलेल्या ताज्या आरोग्य विषयक संशोधनाच्या आधारे सर्जन जनरल वेळोवेळी अमेरिकन माणसाला सल्ला देत असतो….