सिनेमे आय एम नेवेंका
गोवा चित्रपट महोत्सवातला एक वेधक चित्रपट आय एम नेवेंका नेवेंका नावाची तरूण मुलगी. माद्रीद या शहरातली. ती पॉनफेरेडा या गावाच्या नगरपालिकेत नोकरीसाठी येतेय. मेयर इस्माईल तिला पंखाखाली घेतो, तिच्यावर महत्वाच्या कामगिऱ्या सोपवतो, तिला भाव देतो. तिला आपलंसं करतो. जवळीक करतो. लगट करतो. बलात्कारही करतो. नेवेंका नकार देते. मेयर ब्लॅक मेलिंग करतो. नेवेंका धिटाईनं प्रतिकार करते. शेवटी मेयर उघडा पडतो, त्याला तुरुंगवासाची शिक्षा होते. मी टू चळवळ सुरु झाल्यापासून खूप महिलांनी धिटाईनं त्यांच्यावर झालेल्या बलात्कारांना वाचा फोडली. माध्यमांत साऱ्या गोष्टी…