पुस्तक भारताचा सुवर्ण काळ
भारताचा सुर्वण काळ. दी गोल्डन रोड या प्रस्तुत पुस्तकात भारताच्या सुवर्ण काळाचं विश्लेषण आहे. इतिहासात सिल्क रोड ही कल्पना रूढ आहे. चीन (आशिया) आणि युरोप यामधील दळणवळण प्रामुख्यानं ज्या मध्य आशियाई भागातून होत असे त्याला सिल्क रोड असं म्हणतात. हा मार्ग इसवीपूर्व दुसऱ्या शतकापासून जवळपास १५ व्या शतकापर्यंत वापरला जात होता असं मानलं जातं. अनेक पुस्तकं या कल्पनेबद्दल लिहितात. इतिहास संशोधक विल्यम डॅलरिंपल म्हणतात की सिल्क रोड ही एक दंतकथा आहे. सिल्क रोड समजा निर्माण झाला असेल तर १२ व्या…