इराण. काटेरी मुकूट, काटेरी सिंहासन
इराणचे ताजे अध्यक्ष मसूद पेझेशक्यान यांनी अध्यक्षपदाची सूत्र घेतली त्याच दिवशी, काही तासानी इस्माईल हानिये या हमासच्या नेत्याचा तेहरानमधे खून झाला. हानिये पेझेशक्यान यांच्या अध्यक्षपदाच्या जाहीर सभेत हजर होते. हानिये पेझेशक्यान यांच्याशी वाटाघाटी करण्यासाठीच तेहरानमधे पोचले होते. अत्यंत कडेकोट सुरक्षित जागी ते रहात होते त्या गेस्ट हाऊसमधे इसरायलनं ठेवलेल्या टाईम बाँबनं हानिये यांचा जीव घेतला. अध्यक्षपदाचा मुकूटच नव्हे तर खुर्चीही काट्यानं भरलेली आहे याची कल्पना पेझेशक्यान याना आली असावी. # पेझेशक्यान यांच्याकडून जगाच्या आणि खुद्द इराणच्या खूप अपेक्षा आहेत. पेझेशक्यान…