रविवार/गाझा दुर्दशा
गाझातल्या नुसीरत निर्वासित वस्तीत दोन फ्लॅट्समधे चार ओलीस हमासनं लपवून ठेवलेत अशी खबर इसरायलच्या इंटेलिजन्स विभागाला मिळाली. इमारत भर वस्तीत होती. इसरायलचे कमांडो वस्तीत घुसले. त्यांचं इमारतीपर्यंत पोचणं सुकर व्हावं यासाठी इसरायलची हेलेकॉप्टर्स आकाशातून गोळ्याचा पाऊस पाडत होती. कमांडोही वाटेत दिसेल त्याला मारत सुटले होते. पोलिस, कमांडो, लष्करी सैनिक अशांनी एकत्रितपणे ही कारवाई चालवली. कमांडोनी चार ओलिस बाहेर काढले. त्यांना सुरक्षीतरीत्या गाझाबाहेर काढणं हीही मोठी कामगिरी होती. गाझातली जनता आणि हमासचे सैनिक विरोध करत होते. हेलेकॉप्टर्स आणि सैनिक धुँआधार गोळीबार…