रविवार/ माणसं मारण्याची अडाणी पद्धत
२३ जून २०२३. नरेंद्र मोदी वॉशिंग्टन विमानतळावर उतरले. अमेरिकन सरकारनं त्यांना अधिकृत आमंत्रण दिलं होतं. मोदी प्रेसिडेंट बायडन यांच्याशी चर्चावाटाघाटी करणार होते, अमेरिकन संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीसमोर ते भाषण करणार होते. हे आमंत्रण आणि घटना विशेष आहे असं माध्यमांत प्रसिद्ध झालं. प्रेसिडेंट बायडन व्यक्तिशः विमानतळावर पोचले आणि त्यांनी मिठी मारून मोदी यांचं स्वागत केलं. नंतर मोदी आणि बायडन यांच्यात दीर्घ चर्चा झाल्या, काही चर्च केवळ दोघांच्यात झाल्या. दोघांनाही इंग्रजी येत असल्यानं दुभाषाची आवश्यकता नव्हती. दौऱ्यावर निघण्याआधी अमेरिकेतला कार्यक्रम ठरलेला…