रविवार/चीन जिवंत माणसं साच्यात घालतोय
पतिहान इमीन या ७० वर्षाच्या बाई कुराण पठण करत असत, त्यांच्याकडं कुराणाची इलेक्ट्रॉनिक कॉपी होती. त्यांचे कपडे मुस्लीम वळणाचे होते. पोलिसांनी त्यांना पकडलं. फटाफट खटला पूर्ण झाला, त्यांना ६ वर्षं तुरुंगवासाची शिक्षा झाली. इझिगुल मेमेट ही ५ वर्षाची मुलगी तिच्या आईपाशी बसून कुराण वाचत होती. पोलिसांनी तिला पकडलं. तिला १० वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा झाली. ऐतिला रोझी या ३५ वर्षाच्या स्त्रीला ‘बेकायदेशीर’ कपडे वापरण्याबद्दल २० वर्ष तुरुंगवास घडला. कारण बुरखा, पायघोळ झगा वापरणं या गोष्टी तिथं बेकायदेशीर आहेत. एक ८०…