रविवार/ब्लिंकन यांची धावपळ कशासाठी?
अमेरिकेचे परदेश मंत्री अँथनी ब्लिंकन अडीच महिन्याच्या काळात सहाव्यांदा मध्यपूर्वेच्या दौऱ्यावर रवाना झाले. तुर्की, जॉर्डन, इजिप्त, सौदी अरेबिया इत्यादी देशांमधे पटापट जाऊन ते इसरायलकडे निघाले.गाझा युद्ध हा त्यांचा अजेंडा. त्यांचं एक स्वतंत्र विमान. त्यात त्यांचा प्रचंड स्टाफ. बहुदा विमानात त्यांची कारही. ब्लिंकन यांचा दौरा अधिकृत होता. त्यांचे विमानात बसतांना, विमानतळावर उतरतांना फोटो प्रसिद्ध झाले. दौऱ्यात त्यांच्या सोबत अमेरिकेतल्या मोठ्या पेपरांचे बातमीदारही होते. ब्लिंकन विमानात आणि दौऱ्यात ठिकठिकाणी पत्रकारांना ब्रीफिंग करत होते. ब्रीफिंगमधे अट अशी असते की ते जे सांगतील ते…