रविवार/४० हजार रुपयांचे शूज
धूम धडाक्यानं जाहिरात झळकली. एक देखणी मॉडेल, तिनं उंच उचलून धरलेला एक शू, स्पोर्ट शू. खर्चपूर्वक, मेहनतपूर्वक, कौशल्यपूर्वक जाहिरात. शूची किमत ५०० डॉलर. भारताच्या हिशोबात सुमारे ४० हजार रुपये. ।। हा शू एका कंपनीनं मॅरेथॉन धावकासाठी तयार केलाय. हा शू वापरला तर धावकाची धावण्याची कार्यक्षमता तीन चार टक्क्यांनी वाढते. हा शू फक्त एक शर्यत टिकतो. म्हणजे एक शर्यत पळून झाली की शूचा उपयोग नाही. ।। आपल्याकडं आपला एकादा कपडा जुना झाला, विरला, काही ठिकाणी फाटला तर त्या कापडाचे विविध…